कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासह ११६ कोटीची प्रतीक्षा- विवेक कोल्हे
Farmers in Kopargaon taluka waiting for Rs 116 crore with loan waiver and incentive grant – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11March 2021, 17 :30
कोपरगाव: तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी २७५ असुन त्यांना सुमारे ७ कोटी ६१ लाख ९६ हजार रूपये तर नियमीत कर्ज परतफेड करणारे १६ हजार ५७७ शेतकरी असुन त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान याप्रमाणे १०८ कोटी ५६ लाख रूपये मिळणार आहेत त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासह ११६ कोटीची प्रतीक्षा असून शासनाने तात्का्ळ ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी नगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे‘
”महाविकास आघाडी सरकारने पीककर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा परतावा देण्याची घोषणा केली. तर महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतक-यांचे थकीत कर्ज दोन लाखाच्या वरील आहे त्या शेतक-यांना अदयापही कर्जमुक्तीचा लाभ झालेला नाही. असे कोपरगाव तालुक्यात सुमारे २७५ शेतकरी आहेत तर नियमीत कर्जाची परत फेड करणारे १६ हजार ५७७ शेतकरी असुन त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली असुन ही रक्कम तात्काळ शेतक-यांच्या खाती जमा करावी,
मागील हंगामात शेतक-यांना अतिवृष्टी चा फटका बसला त्यामुळे त्यांच्या हातुन खरीपाचे पीक वाया गेले तर रब्बी हंगामाची पीके उभी करतांना त्यांना पैशाची जमवाजमव करतांना कष्ट पडले, त्यात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले आहे. रब्बी पीक काढणीला आले आहे त्याचा खर्चही मोठा आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम तात्काळ जमा करून शासनाने जिल्हयातील सर्व शेतक-यांना दिलासा दयावा, असेही श्री कोल्हे यांनी म्हटले आहे.






