कोपरगाव चांदेकसारेतून समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन धावणार? मग स्मार्ट सिटी हवीच की
Will bullet train run from Kopergaon Chandeksare with Samrudhi? Then there is the smart city
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12March 2021, 17 :30
कोपरगाव : राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच बुलेट ट्रेनचा कॉरिडोअर उभारण्याची शक्यता असून, या दृष्टीने सर्वेक्षण हातात घेण्यात आले आहे. काही ठिकाणी सॅटेलाईटच्या साह्याने शेतांमध्ये खुणा रोवण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून विविध प्रश्न उपस्थित केल्या जाऊ लागले आहेत.काल काही अधिकाऱ्यांनी चांदेकसारे ग्रामपंचायतीला या संदर्भात भेट दिल्याचे समजते. आता चांदेकसारे बुलेट ट्रेन धावणार म्हणजे स्मार्ट सिटी हवीच की, चला तर मग त्यासाठी पाठपुरावा करू या,
दोन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी या रस्त्यासाठी चांदेकसारे भागातील मोठया प्रमाणात जमीन अधिग्रहीत करण्यात आली. या जमिनीचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यानंतर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला सुधारित दराने देण्यात आला. आता या समृद्धी महामार्गाचे काम बहुतांश पूर्णत्वास येत असतानाच आता या महामार्गाला लागून नागपूर ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावण्याची चिन्हे आहेत. शिर्डी नाशिक रोडच्या जमिनीही अधिग्रहित करुन तेथे इंदोर महामार्गाचे काम चालू झाले. आता चांदेकसारे परिसरातून बुलेट ट्रेन केली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने एका पथकाने नुकतीच पाहणी सुद्धा केली आहे.
यासंदर्भात काल चांदेकसारे येथे बुलेट ट्रेन बाबत अधिकाऱ्यांसोबत चांदेकसारे ग्रामपंचायतीमध्ये बुलेट ट्रेनचे अधिकारी शाम चौगुले, संर्वेक्षण अधिकारी श्री तायडे यांचेबरोबर चर्चा झाली.यावेळी माजी सरपंच केशवराव होन, सरपंच पुनम खरात, आनंदराव चव्हाण, ॲड ज्ञानेश्वर होन, अशोक होन,शरद होन,भिमाजी होन, दिलिप होन, फिरोज शेख,रवि खरात अदी उपस्थित होते. विदर्भातील नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजालाड, मालेगाव, मेहकरसह जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर, मुंबई, अशा मार्गाने ही रेल्वे धावू शकते. समृद्धी महामार्ग मुळे चांदेकसारे गावाचे नशीब खुलले आधी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आता बुलेट ट्रेन शिर्डी नाशिक महामार्ग, गुजरात शिर्डी महामार्ग भविष्यात चांदेकसारे हे महामार्गावरील मोठे शहर झाल्यास नवल नको तरीही दुर्दैवाने चांदेकसारे येथील स्मार्ट सिटी रेंगाळली आहे. अजूनही पुन्हा स्मार्ट सिटी मिळविण्याची संधी आहे बुलेट ट्रेन ला नागपूर-मुंबई महामार्गावर बुलेट ट्रेनला बारा थांबे देण्यात येणार आहेत त्यामुळे चांदेकसारे स्मार्ट सिटी झाल्यास शिर्डीसाठी येथे बुलेट ट्रेनचा थांबा होऊ शकतो तेंव्हा याबाबत येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास पुन्हा या ठिकाणी स्मार्ट सिटी होऊ शकेल एकदा का स्मार्ट सिटी झाली तर या भागातील विकास पुढील शेकडो वर्षे झपाट्याने होत राहील कोपरगाव शहरातील राजकीय व विविध क्षेत्रातील तज्ञ व उद्योजक यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. भविष्यात कोपरगाव शैक्षणिक हब पाठोपाठ औद्योगिक हब सुद्धा होऊ शकते. तेंव्हा दैव देते आणि कर्म नेते अशी गत होऊ देऊ नका!