आता कोविड सेंटर सुरू करण्याची हीच योग्य वेळ – सौ स्नेहलता कोल्हे
Now is the right time to start Kovid Center – Mrs. Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 14March 2021, 21 :00
कोपरगाव : राज्यासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन शासनाकडून वारंवार करण्यात येत असले तरी गतवर्षीची पार्श्वभूमी लक्षात घेता व कोपरगावात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोविड सेंटर सुरू करण्याची योग्य वेळ असल्याची मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
कोपरगावात सोमवारी (१५) रोजी कोरोनाचे ३० रूग्ण आढळल्याने आता कोरोना रूग्णांची संख्या २३६ वर पोचली असून, रूग्णांची वाढती संख्या पाहता कोपरगावात आता तातडीने कोविड सेंटर सुरू करण्याची गरज आहे यापूर्वी कोपरगाव शहरातील एस. एस. जी. एम. महाविद्यालयातील मुलींचे वस्तीगृह अधिगृहीत करून १०० रूग्णांची एकाचवेळी सोय करण्यात आली होती त्यामुळे रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळवून अनेक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते .
सौ कोल्हे म्हणाल्या, वस्तुस्थिती पाहता आकडेवारी कमी झालेली असली तरी कोरोना चे संकट अद्यापही कमी झालेले नाही, प्रत्येक तालुक्यात शासनातर्फे कोरोना रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड, सात दिवस विलिनीकरण, मोफत औषधोपचार, शरीराचे तापमान ऑक्सिजनची पातळी व रक्ताच्या तपासण्या, छातीचे एक्स-रे, गरजूंना ऑक्सिजन सुविधा, चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची व्यवस्था ही खासगी रुग्णालयांमधून लाखो रुपये खर्च करून, मिळणारी वैद्यकीय सेवा शासनाच्या हेल्थ सेंटरमध्ये मोफत उपलब्ध झाल्याने अनेक नागरिकांचे प्राण वाचले होते. त्यामुळे मागील सात- आठ महिने गोरगरीब रुग्णांसाठी शासनाचे कोविड हेल्थ सेंटर देवदूत ठरले होते असेही सौ कोल्हे म्हणाल्या.
सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद केले. तर नवीन वर्षात २६ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आल्यानेनागरिकांना खासगी ठिकाणी भरमसाठ पैसे माजावे लागत आहे. पैशाअभावी काहीजण उपचार घेणे टाळत आहे. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागण्याची भीती आहे. ही नागरीकांची गैरसोय व समस्या सोडविण्यासाठी बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर सुरु करणे तातडीने गरजेचे असल्याचे मागणी आम्ही एक दीड महिन्यापूर्वी केली होती असेही सौ. कोल्हे म्हणाल्या, .
सौ कोल्हे म्हणाल्या आज तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोपरगाव येथे कोविड सेंटरची गरज आहे . त्यामुळे प्रशासनाने कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची योग्य वेळ आहे त्यामुळे योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण सध्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर उपचार चालू आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याचे आरोग्य विभागासह तालुका प्रशासनाची मोठी कसरत करावी लागत आहे.त्यात सध्या कोरोना लसीकरण सुरू असल्याने ग्रामीण रुग्णालयावर मोठा ताण पडत असून लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या गर्दीमुळे या ठिकाणी कोरोना रुग्णांना ठेवणे धोकादायकच आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी एसएसजीएम महाविद्यालयात covid-19 सेंटर सुरू करण्याचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.





