देशी दारूचे दुकान फोडून पावणे चार लाखाची दारूची चोरी

देशी दारूचे दुकान फोडून पावणे चार लाखाची दारूची चोरी

Breaking down a local liquor store and stealing 3 lakh 75 Thousand  liquor

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 14March 2021, 20 :30

कोपरगाव : कोकण ठाम शिवारातील पुणतांबा चौफुली येथील नागपूर मुंबई महामार्गालगत असलेल्या सरकार मान्य देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडून ३ लाख ७५ हजार ४१० रूपयांची देशी दारू चोरून नेली.

ही घटना शनिवारी रात्री घडली. महामार्गालगत असलेल्या देशी दारूचे दुकानाचे शनिवारी (१३)रात्री १० ते रविवारी (१४) रोजी सकाळी ९.३० दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद देशी दारू दुकानाचे शटर तोडून देशी दारूचे प्रत्येकी २१७० रुपये किमतीचे १८० मिली चे १७३ बॉक्स ३ लाख ७५ हजार ४१० रूपये किंमतीचे दारूचे बॉक्स बॅच नंबर २१२९,२०१९,२०७६, २०५१,२०४१ सर्व मार्च २०२१ असे चोरून नेले. विशेष म्हणजे या परीसरात मोठी रात्रंदिवस महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असतानाही ही चोरी झाली. या प्रकरणी दुकान मालक सौ दमयंती विजय शिखरे (६१) घरकाम रा. सात्रळ तालुका राहुरी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रविवारी (१४) रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहीती कळताच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळाची पहाणी केली तर दारू बंदी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येऊन गुन्हा दाखल केला. शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सबइन्स्पेक्टर नागरे हे पुढील तपास करीत आहेत.

मागील सतरा-अठरा दिवसापूर्वी या घटनास्थळापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर झगडे फाटा चांदेकासारे शिवारात ट्रक अडवून चालकाला मारहाण करून साडे सव्वीस लाखाची देशी दारू चोरून न नेल्याची घटना घडली होती सातत्याने देशी दारू लुटण्याचा व दुकान उडण्याच्या घटना घडत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page