कोरोना लस व औषधांची आ. काळे यांची ना. टोपे व ना. शिंगणे यांचेकडे मागणी
Corona vaccines and drugs. Mla Kale’s Na. Tope and no. Demand from Na. Shingane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 7April 2021, 19:15 :00
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील कोरोना बाधितांची लक्षणीय वाढ बघता मुबलक कोरोना लस व आवश्यक औषधे तातडीने द्या, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कोरोना संख्या वाढल्याने औषधाची मागणी वाढली आवश्यक औषधासाठी लोकांची धावपळ होत आहे रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी या औषधांचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामतः परिस्थिती नसताना नागरिकांना जादा पैसे द्यावे लागतील. कोरोना लस कमी प्रमाणात मिळत असल्याने प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
एकूणच गांभीर्याने विचार करून कोपरगाव मतदार संघासाठी जास्तीत जास्त औषधांचा पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेस तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी आ. काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे ना.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.





