बैठका कुठेही घ्या, आता भुलविण्याचे पाप बंद करा; पिके जळून गेल्यावर पाणी सोडणार का ?-सौ. स्नेहलता कोल्हे
Take meetings anywhere, now stop the sin of delusion; Will water be released after burning crops? Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 8April 2021, 18:00 :00
कोपरगाव : कालवा सल्लागार समितीच्या बैठका दिल्ली- मुंबई अन्यथा कुठेही घ्या.पण आता आवर्तनासंबंधी शेतकऱ्यांना भुलविण्याचे पाप करू नका, पिके जळून गेल्यावर पाणी सोडणार का? असा थेट सवाल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना केला .
सौ. कोल्हे म्हणाल्या,गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून जात असतांना गोदावरी कालव्यांना शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार! याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. मात्र लोकप्रतिनिधींच्या सिंचन व्यवस्थेकडॆ झालेल्या दुर्लक्षामुळे आवर्तन सुटण्यास उशीर झाला आहे, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हाती आलेली पिके जळून गेल्यावर शेतीचे आवर्तन सुटले तर त्याचा फायदा होणार आहे का? असा सवाल त्यांनी केला, येत्या १३ तारखेला दोन रोटेशन सुटणार असल्याचे सांगितले जात आहे.पण आज पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना पिके जळू द्यायची आणि नुकसानीनंतर एकाच वेळी दोन आवर्तने देऊन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम लोकप्रतिनिधी करणार आहेत काय? हाही प्रश्नच असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या.
मागील सरकारच्या काळात कालवा सल्लागार समितीच्या बैठका मंत्रालयात होतात, म्हणून मोठे आकाडतांडव केले, या सरकारच्या काळात मतदार संघात बैठका घेउन सत्कार घडवुन थाटमाट केला, मात्र सिंचनाच्या आवर्तन विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून येथील शेतकरी वा-यावर सोडण्याचे काम केले आहे. आवर्तन विषयावर टोलवाटोलवी केली, मतदारसंघात कालवा समितीच्या बैठका घेऊन मग लोकप्रतिनिधींनी साधले काय ? असा सवाल उपस्थित करून शेतक-यांविषयीचे तुमचे बेगडी प्रेम उघडे पडले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठका दिल्लीत घ्या, मुंबईत घ्या अन्यथा कुठेही घ्या. पण शेतक-यांना वेळेवर आवर्तने दया, शेतक-यांना भुलविण्याचे पाप आता तरी बंद करा असा टोला सौ. कोल्हे यांनी शेवटी लगावला .





