ग्रामीण कोविड सेंटरला ‘“श्री अरिहंत दिगंबर जैन महिला प्रतिष्ठानचा”’लाखाचा आधार,

ग्रामीण कोविड सेंटरला ‘“श्री अरिहंत दिगंबर जैन महिला प्रतिष्ठानचा”’लाखाचा आधार,

Lakhs of Aadhaar of ‘Shri Arihant Digambar Jain Mahila Pratishthan’ to Gramin Kovid Center

मातृदिनी एक लाखाच्या औषधांचे दान Donation of one lakh medicines on Mother’s Day

कोपरगाव : कोपरगाव येथील ‘“श्री अरिहंत दिगंबर जैन महिला प्रतिष्ठान वतीने मातृदिनाचे औचित्य साधून एक लाख ५ हजार रुपये किमतीची औषधे ” कोपरगाव ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरला देण्यात आली. येथील कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर (Covid Center) सुरू असून तेथे मोफत उपचार केले जात आहेत.

येथील रुग्णास औषधांची टंचाई जाणवू लागल्यामुळे येथील तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी लोकांना मदतीचे आभाळ केले होते. येथील कोविड केअर सेंटरमधील औषध टंचाईची माहिती मिळताच येथील ‘“श्री अरिहंत दिगंबर जैन महिला प्रतिष्ठान यांनी जिओ और जिने दो हे भगवान महावीरांचे तत्व लक्षात ठेवून डॉ कृष्णा फुलसौंदर व डॉ. वैशाली बडदे यांच्याशी संपर्क साधून त्यांचेकडे एक लाख ५ हजारांची औषधे उपलब्ध करून देण्याचे योगदान दिले. यावेळी ‘“श्री अरिहंत प्रतिष्ठानच्या वरिष्ठ कार्यकर्ता श्रीमती प्रेमाबाई सोहनलाल बज, सौ. शोभा ठोळे व सौ. कंचन अजमेरे यांचे विशेष मार्गदर्शनाखाली सदस्य सौ. शोभा अजमेरे, सौ. संगीता बज, सौ. विशाखा शहा, सौ. हेमा अजमेरे, सौ. रिता काले आदी उपस्थित होते. अनंतकुमार सुधीर बज यांनी या औषध दान करण्याच्या कामात विशेष कामगिरी करून आम्हाला कामात हातभार लावला व यशस्वीरित्या काम पार पाडले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे औषध विभागाचे प्रमुख शिंदे व डॉ. रणदिवे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती प्रेमाबाई सोहनलाल बज यांनी केली व सौ. कंचन अजमेरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page