गोदावरी कालवे दुरूस्तीसाठी आजपर्यंत ४० कोटी मंजूर – आ. आशुतोष काळे

गोदावरी कालवे दुरूस्तीसाठी   आजपर्यंत ४० कोटी मंजूर – आ. आशुतोष काळे

40 crore sanctioned till date for Godavari canals -Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fir 18June :16.00

कोपरगाव : जलसंपदा मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी रुपये दिले असून पुन्हा २६ कोटी रुपये निधी मंजूर केले आहे. अशा प्रकारे आजपर्यंत ४० कोटी रुपये निधी मिळाला असून अजूनही ४४ कोटी रुपये लवकरच देणार असल्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी सांगितले आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला गोदावरी कालव्यांची दुरुस्ती करणार असे आश्वासन आ. आशुतोष काळे यांनी दिले होते. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच दोनच महिन्यात जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांची भेट घेवून शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या अशी मागणी केली होती. जलसंपदा मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेवून कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आ. काळे यांचे प्रयत्न सुरूच होते. त्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून त्यांच्या मागणीची दखल घेवून जलसंपदा मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी रुपये दिले असून पुन्हा २६ कोटी रुपये निधी मंजूर केले आहे. अशा प्रकारे ४० कोटी रुपये निधी मिळाला आहे. जीवघेण्या कोरोना संकटात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देतांना अडचणी येत असतांना देखील निधी मिळाला हि लाभधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे.या निधीतून कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार असून अजूनही निधी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरूच राहणार असून पिण्याचे पाणी, शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page