घरी रहा सुरक्षीत रहा व सोशल डिन्स्टन्सींग पाळा- बिपीनदादा कोल्हे

घरी रहा सुरक्षीत रहा व सोशल डिन्स्टन्सींग पाळा- बिपीनदादा कोल्हे

Stay at home, stay safe and follow social deterrence – Bipindada Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 19June :18.30

कोपरगांव : घरी रहा सुरक्षीत रहा, स्वत: बरोबरच कुटूंबाची काळजी घ्या, सामाजिक अंतर पाळा व जास्तीत जास्त नैसर्गीक प्राणवायू मिळविण्यांसाठी सर्वांनी आपल्या घराशेजारी, परिसरात, गावात, वाडया वस्त्यावर, जेथे जेथे रिकाम्या जागा असतील तेथे तेथे मोठया प्रमाणांत वृक्षारोपण करावे असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी जनतेस केले आहे.

बिपीनदादा कोल्हे वाढदिवसदिनी २१ जुन रोजी बाहेरगांवी असल्यांने ते भेटु शकणार नाही. त्यांच्याप्रती असलेल्या सदिच्छा वृध्दींगत करण्यांसाठी सर्वांनी वरील आवाहनाचे काटेकोरपणे पालन करून वाढदिवसानिमीत्त हार,तुरे, शाली, श्रीफळ आदिंवर खर्च न करता सदर रक्कमेचा विनीयोग गोर-गरीब, तसेच रूग्णांना आर्थीक मदत करून करावा, तसेच जेंव्हा शाळा सुरू होतील तेंव्हा हुशार होतकरू गोर गरीब विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शालेय साहित्य, वहयांचे वाटप सालाबादप्रमाणे याही वर्षी करावे, जनतेने आजवर आपल्यावर भरभरून प्रेम केलेले आहे म्हणुन त्यांच्या आशिर्वादांने कोपरगांव मतदार संघवासियांवर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून जे सहकार्य करता येईल ते देण्यांचा प्रयत्न केला आहे असेही ते म्हणांले.

Leave a Reply

You cannot copy content of this page