“ माझे कुटुंब, माझी जबाबदारी मेमरी फोटो काँटेस्ट’ ऑनलाईन स्पर्धा– आ. आशुतोष काळे
“My Family, My Responsibility Memory Photo Contest ‘Online Competition -MLA. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 29June :18:57
कोपरगाव :भविष्यात आरोग्य संबंधित अडचणी निर्माण होऊ नये. यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होऊन नागरिकांना योग्य माहिती मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी बूनलाईंज (Boonlinez) कोपरगाव या मोबाईल ॲपच्या व ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मेमरी फोटो काँटेस्ट’ शुभारंभ प्रसंगी केले .
आ.काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व विविध शासकीय कार्यालयांची माहिती समाविष्ट करण्यात आल्याने अचूक महिती मिळून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजनामूळे नागरिकांना बक्षीस जिंकण्याची संधी कौतुकास्पद असल्याचे आ. काळे यांनी म्हटले आहे.
सुधीर डागा म्हणाले, आ. आशुतोष काळे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उचललेले पाऊल व शहरातील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीमुळे व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे.
यावेळी धरमशेठ बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, सुधीर डागा, डॉ. अजय गर्जे, प्राचार्य डॉ. थोपटे सर, संतोष चवंडके, दिनार कुदळे, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी, बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, नारायण लांडगे, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, मुकुंद इंगळे, संतोष शेलार, एकनाथ गंगूले, सुरेश सोनटक्के, इम्तियाज अत्तार, अंबादास वडांगळे, संदीप कपिले, शुभम लासुरे, महेश उदावंत, हारूण शेख, राहुल चवंडके, याकूब शेख आदींसह नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.





