जीएसटीत नियमित भरणा; सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचा देशपातळीवर सन्मान.
Regular payment in GST; Sahakar Maharshi Kohle factory honored at national level.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 3July :17:30
कोपरगाव : साखर आणि उपपदार्थ निर्मितीत देशात सर्वोच्च पातळीवर अग्रगण्य असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा केल्याबद्दल सीबीआयसी विभागाचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी सर्टिफिकेट ऑफ अॅप्रोप्रिएशन बेस्ट अवॉर्ड प्रमाणपत्र देऊन सन्मान केला असल्याची माहिती अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कारखान्यात संजीवनीचा समावेश आहे.
बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी साखर कारखान्याने प्रत्येक हंगामातील संकटावर मात करीत यशस्वी मार्गाक्रमण सुरु ठेवले आहे. थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणारा देशातील पहिलाच सहकारमहर्षी कोल्हे कारखाना आहे. केंद्र शासनाने २०१७ पासून जीएसटी करप्रणाली लागू केली तेव्हापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याने यात अत्यंत सूक्ष्म माहितीचे संकलन करून संगणकीय पद्धतीने विहीत नमुन्यात वेळेत जीएसटी भरून शासनास सहकार्य केले आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाचे सी बी आय सी चे अध्यक्ष एम. अजितकुमार यांनी हे प्रमाणपत्र देऊन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कार्याचा गौरव केला आहे. या पुरस्कारात कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी सर्व आजी माजी संचालक मंडळ, व्यवस्थापन प्रमुख, तत्सम बांधव, लेखा विभागाचे सर्व पदाधिकारी, व्यवस्थापन कर्मचारी वर्ग, लेखापरीक्षक, व्यापारी आदि ज्ञात-अज्ञात घटकांचा सिंहाचा वाटा आहे.
कोल्हे कारखान्यास आजवर शासकीय-निमशासकीय स्स्तरावरील वीस विविध पारितोषिके मिळालेले आहेत.