अंगारक संकष्ट चतुर्थीला गणपती मंदिरे कोरोनामुळे पडली ओस
On Angarak Sankashta Chaturthi, Ganpati temples fell due to corona
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: wen 28July 8:45
कोपरगाव : मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले की, महाराष्ट्रातील सर्व गणेश मंदिरात अलोट गर्दी असते. मात्र कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिर भाविकांसाठी बंद आहे. तरीदेखील अनेक भाविक गेट बाहेरुनच गणरायाला नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत.
मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी होती मात्र कोरोना महामारी मुळे तालुक्यातील पोहेगाव येथील मयुरेश्वर गणपती मंदिर संवत्सर येथील चिंतामणी गणपती मंदिर बेट भागातील श्री गणेश शहरातील गोकर्ण गणेश रस्त्यावरील श्री विघ्नेश्वर मंदिर आदी ठिकाणी मंदिरे बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झाला अनेकांनी दूर वरूनच दर्शन घेण्यात धन्यता मानली. त्यामुळे मंदिरा लगत बसणाऱ्या छोट्यामोठ्या व्यावसायिकांची चांगलीच परवड झाली मंदिरापासून दूरवर लांब त्यांनी दुकाने लावली होती कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद आहे नागरिक महिलांना गेल्या सतरा अठरा महिन्यापासून कुठेही बाहेर फिरण्यास पडता येत नाही त्यामुळे अनेक जण नाखूष आहेत कोरोना ची महामारी कधी जाईल पहिल्यासारखे दिवस कधी येतील असे नागरिकांना झाले आहे विघ्नहर्त्या गणरायाला अनेकांनी मनोमन प्रार्थना केली.