श्री गुरु शुक्राचार्यांच्या नव्या सिंहासनाला चांदीचा मुलामा देणार  

श्री गुरु शुक्राचार्यांच्या नव्या सिंहासनाला चांदीचा मुलामा देणार  

Shri Guru will give silver plating to the new throne of Shukracharya

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lMon23 August 19:20

कोपरगाव : शहरानजीक असलेल्या बेट भागातील सोमवार निमित्त औचित्य साधून परमसद्गुरु श्री गुरु शुक्राचार्य महाराज यांना मंदिर प्रशासनाच्या वतीने सिंहासन बनवले असून त्या सिंहासनाला येथील आयुर्वेद तज्ञ डॉ.  रामदास आव्हाड यांनी चांदीचा मुलामा देण्याचे कबूल केले आहे. दोन सिंहासने बनवण्यात येणार असून  एक सिंहासन  कायमस्वरूपी मंदिरात ठेवण्यात येईल याच सिंहासनाला चांदीचा मुलामा देण्यात येणार आहे व दुसरे सिंहासन भक्तांना अभिषेक करण्यासाठी मंडपात ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 या सिंहासनाचे श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक करून मुखवटापूजन  येथील आयुर्वेदिक तज्ञ डॉ. रामदास आव्हाड त्यांच्या पत्नी  सौ अंजली आव्हाड  होमिओपॅथिक डॉ. राजेंद्र श्रीमाळी सौ मनीषा श्रीमाळी यांचे हस्तेकरण्यात आले . सिंहासनाचे पुजन करीत असतानाच डॉ. आव्हाड यांनी लगेचच सिंहासनाला चांदीचा मुलामा देण्याचे गुरु शुक्राचार्य मुखवट्याच्या साक्षीने कबूल केले .सदरचे सिंहासन श्रीरामपूर येथील स्वामी आर्ट चे चालक कलाकार रोहिदास राऊत यांनी केले असून हे सिंहासन संपूर्ण ऍक्रेलिक पद्धतीने बनवले आहे त्यांनी याआधी या मंदिरासाठी दोन वर्षापूर्वी दोन मोठाले हत्ती गजराज मंदिरासाठी तयार करून दिले होते अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली. यावेळी सचिन परदेशी, प्रसाद
प-हे, मुन्ना आव्हाड, संजय वडांगळे,  विकास शर्मा ,विशाल राऊत, भागचंद रुईकर, डी. एन. आव्हाड सर यांच्यासह नागरिक सोशल डिस्टंसिंग पळून उपस्थित होते. डॉ. आव्हाड यांनी चांदीचे सिंहासन बनवून देण्याचे कबूल केल्याने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

You cannot copy content of this page