काहीही बरळनार्‍या विरोधकांना भीक घालत नाही – सौ. स्नेहलता कोल्हे

काहीही बरळनार्‍या विरोधकांना भीक घालत नाही – सौ. स्नेहलता कोल्हे

Nothing begs the opponent – Mrs. Snehalta kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir8 Oct 2021,16:30Pm.

कोपरगाव :कोरोना मध्ये साक्षात मृत्युलाही मी घाबरवले नाही. विकासावर बोलण्याऐवजी काहीही बरळणा-या बोलघेवड्या विरोधकांना तर साधी भिकही घालणार नाही अशी सणसणीत चपराक भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात दिली.

संजीवनी हेल्पलाईन शुभारंभ

सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, टीकाकारांमुळेच मी घडले, त्यामुळे मी त्यांचे आभारच मानते. सुरुवातीला महिला असल्याने टीका केली की, डोळे भरून यायचे कारण काय तर मी काही राजकारणी नव्हते पण नंतर याच डोळ्यातील पाण्याला शस्त्र बनवले निर्धार केला आता “रडायचे नाही तर लढायचे” आणि मला एक नवी ऊर्जा मिळाली हाच मंत्र तुम्हा महिलांना मी देते कारण ती श्री शक्तीचा जागर आहे. लक्षात ठेवा,

सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या, जय-पराजय होतच असतात एक महिला असतानाही माझ्या पराभवासाठी सर्व विरोधकांना एकत्र यावे लागले हा माझ्या कर्तुत्वाचा व माझ्यातील स्त्रीशक्तीचा जागर असुन यालाच मी विजय मानते. अवघे चारशे मतांचे अंतर होते.त्यामुळे अवघा मतदार संघ माझाच आहे असे मी मानते म्हणून मतदार संघातील कुठल्याही मतदाराला कधीही अंतर देणार नाही. आजही जेंव्हा मी पक्षाच्या कार्यक्रमाला जाते त्यावेळेस तिथे पक्षाचे नेते व मंत्री आमची कोपरगावची शिट अवघ्या चारशे मतांनी गेली असे म्हणतात त्यावेळेस मला माझ्या कामाची पावती मिळाल्याने ऊर भरून येतो.

सर्वरोग निदान शिबीरात रुग्णांची चौकशी करताना सौ. स्नेहलता कोल्हे

कोरोनाच्या बेडवर ही मी कार्यकर्ते असो की, विरोधक सर्वांच्याच आयुष्यासाठी देवाकडे मागणे मागत होते. कोरोना काळातील जबरदस्तीची विश्रांती वगळता सातत्याने मतदारसंघाच्या या त्या टोकाला मी लोकांच्या सुखदुःखात सातत्याने सहभागी आहे. यापुढेही राहणार तर संजीवनीच्या माध्यमातून संजीवनी  प्रतिष्ठान व विवेक कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची सेवा केली सेवाभाव हा तर माजी मंत्री शंकरराव कोल्हे संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी कोल्हे घराण्याला सेवाभावी वृत्ती व माणसात देव पाहण्याची शिकवण दिली आहे त्यामुळे मी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानते. खरेतर राजकारण हा माझा पिंड नव्हता मी महिलांच्या सबलीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून काम करीत होते त्यातूनच सर्वांच्या आग्रहाखातर मला राजकारणात यावे लागले, परंतु तिथेही मला सरकार मध्ये चांगले सहकारी मिळाल्याने मतदार संघातील बरीच कामे करता आली भले आज श्रेय कोणीही घेवो, परंतु आज ती कामे पूर्ण होताना मी पाहते तेंव्हा मला त्याचे एक वेगळेच आत्मिक समाधान मिळते, मी श्रेयापेक्षा आत्मिक समाधानालाच अधिक महत्त्व देते . वाढदिवसाच्या निमित्ताने जेंव्हा विविध क्षेत्रातील सर्वजण माझ्यावर शुभेच्छा च्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करतात तेंव्हा ती प्रेरणा मला नवीन ऊर्जा देते.

शुक्रवारी (८) रोजी कलश मंगल कार्यालयात कोपरगाव भारतीय जनता पार्टी, भारतीय युवा मोर्चा, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते सर्व रोग निदान शिबिर, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, गौरी गणपती सजावट बक्षीस वितरण व संजीवनी हेल्पलाइनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने हजर होते. भाजपा शहराध्यक्ष दत्ता काळे यांनी प्रास्ताविक केले तर तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम यांनी  यांनी आभार मानले.

चौकट

एक महिला एवढ्या वेगाने विकास करत असल्याचे पाहून आता आपले काही खरे नाही हा धोका त्यांनी ओळखला होता त्यामुळे धडकी भरलेले परस्पर विरुद्ध विचारधारेचे सर्व विरोधक माझ्या पराभवासाठी एकत्र आले आणि कुठलेही कर्तुत्व नसताना एक अल्पमतातील आमदार सत्तेवर येण्याचा चमत्कार त्यांनी घडवून आणला.- सौ. स्नेहलता कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page