खरीप पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी-सौ. कोल्हे 

खरीप पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी-सौ. कोल्हे

Compensation for kharif crop loss should be given through comprehensive panchnama. Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu7 Oct 2021,18:30Pm.

  कोपरगांव : गुलाब चकीवादळाच्या प्रभावाने झालेली अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खरीप पिकाचे सरसकट पंचनामे करून शासनाने भरपाई देऊन मदतीचा हात द्यावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी गुरुवारी तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडे केली आहे.

      याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, पालिका गटनेते रविंद्र पाठक, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे संचालक साहेबराव कदम, दिपक चौधरी, विनोद राक्षे, निलेश बो-हाडे, आदि उपस्थित होते.           

 सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, दसरा दिवाळी सण तोंडावर आले आहेत, केंद्र व राज्य शासनाने विनामोबदला स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत करावे जेणेकरून त्याचा फायदा शिधापत्रिका धारकांना होईल. ज्या ज्या शिधापत्रिका धारकांचे विभक्तीकरण झालेले आहे. त्यांचा अन्न सुरक्षा यादीत समावेश करावा, त्याचप्रमाणे गोदावरी नदीला पुर आल्यानंतर शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन या शेतकरी बांधवांना अद्यापही शासकीय भरपाई मिळालेली नाही ती तात्काळ देण्यात यावी.           

सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, शेतक-यांच्या बांधावर जाउन त्याच्या नुकसानीची पाहणी करून त्यास भरपाई द्यावी, यात मिळालेला आधार त्याला रब्बीची पिके घेतांना उपयोगी पडणार आहे. पीक विमा कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी शेतक-यांच्या नुकसानीला दाद देत नाही. पावसाच्या पाण्याने ठप्प झालेला रेल्वे भुयारी मार्ग सुरू करावा अतिवृष्टीमुळे चिकनगुनिया, मलेरिया, अतिसार, डेंगु, कोरोना आदि सार्थीच्या आजारात वाढ झाली आहे त्यावर प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात असे त्या शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page