कोपरगावला पाऊस व गारपिटीच्या नुकसानीचे ५०.४२ लाख – आ. आशुतोष काळे

कोपरगावला पाऊस व गारपिटीच्या नुकसानीचे ५०.४२ लाख – आ. आशुतोष काळे

50.42 lakh for rain and hail damage to Kopargaon. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue12 Oct 2021,17:00Pm.

 कोपरगाव : २०२१ मध्ये मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी झालेला पाऊस व झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५०.४२ लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

अवेळीच्या पाऊस व गारपीठमुळे १० गावातील ३५८.९६ हेक्टर क्षेत्रातील ९९९ शेतकऱ्यांना हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता.काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आ. काळे यांच्या पाठपुरावातून महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५०.४२ लाख रुपये रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे.

चौकट :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाला २०१९ पासून अतिवृष्टी, महापुर, संकटे आली त्या-त्यावेळी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून प्रयत्नातून आजवर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधीची मदत मिळवून दिली आहे. – आ. आशुतोष काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page