कोपरगावमधील गोवंश हत्या बंद अवैध कत्तलखाने ३१ ऑक्टोबरपर्यंत उद्ध्वस्त करा
Destroy illegal slaughterhouses in Kopargaon by October 31
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue12 Oct 2021,17:30Pm.
कोपरगाव : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही कोपरगाव शहर व तालुक्यात राजरोस गोवंश हत्या करुन गोवंशाच्या मांसाची तस्करी सुरु आहे. याबाबत पोलिसांना वारंवार माहिती देवूनही जुजबी कारवाई केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटना यांनी मंगळवारी (१२) मोर्चाने जाऊन तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलिस स्टेशन व बाजार समिती यांना कत्तलखाने उध्वस्त करण्याबाबत निवेदन दिले असून या निवेदनामध्ये ३१ ऑक्टोबर या अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की शहरातील संजय नगर बैल बाजार या भागात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने आहेत. बेकायदेशर पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल व मांसाची विक्री होते. सुमारे १०० ते २०० जनावरे बाजार समितीच्या यार्डात. तसेच गटारातून रक्तासह मांसाचे निरुपयोगी भाग वाहत जावून गोदावरी नदीपात्रात मिसळतात. यामुळे तालुक्यातील , गोदावरी नदीकाठच्या गावातील पाणी पुरवठा दुषित व दुर्गंधीयुक्त झाला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गाईला व गोदावरी नदीला हिंदू लोक माता म्हणतात गोदावरी नदीचे पाणी आम्ही धार्मिक कार्यासाठी तसेच अभिषेकासाठी वापरतो त्यामुळे हे रक्तमिश्रित पाणी अभिषेकासाठी वापरले जाते तसेच शेतीसाठी पाणी वापरत असल्यामुळे हे रक्तमिश्रित पाणी अन्नधान्यासाठी वापरले जाते. कोपरगाव येथून मुंबई, भिवंडी, औरंगाबाद, आदी ठिकाणी गोवंशाच्या मांसाची निर्यात होते. गेल्या १३ फेब्रुवारी २०१८ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी ३७५ गोवंश जनावरे व २१ हजार किलो मांअसास कोट्यावधी रुपयांच्या गोवंश पोलिसांनी पकडली होती. त्यानंतरही दीड दोन वर्षातील घटना पाहिल्यानंतर मोठ्या अर्थकारणातून कोपरगाव गोवंशाची कत्तल व मांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिध्द झाले आहे.गोवंशाची कत्तल होत असून, पकडलेले मांस आर्थिक तडजोडीतून कमी दाखवले जात असल्याचा, तसेच आरेपींना मैत्रीपूर्ण संबंधातून पाठिशी घातले जात असल्याचा आरोपही यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे. छाप्यानंतर या कत्तलखान्याचा मूळ मालक, जनावरांचा पुरवठादार, आर्थिक पाठबळ देणारी व्यक्ती, वाहतूक व विक्री करणारी व्यक्ती यांना कायद्याच्या कक्षेत घेतले जात नसल्याने हा धंदा निर्विघ्नपणे सुरु असतो. कोपरगाव येथील बेकायदेशीर कत्तलखाने ३१ ऑक्टोबर पर्यंत कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पोलिस ठाण्यांला देण्यात यावे, गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकावर गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी कायदा तसेच बाजार नसतानाही बाजार समितीच्या आवारात गोवंश बांधून ठेवण्यात येतात त्यामुळे बाजार समितीचे संचालकावर गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत कारवाई करावी तसेच बाजार समितीने जनावरेखरेदी विक्री जनावरांचे रंगरूप निहाय आवक जावक रजिस्टर चोख ठेवावे अशी मागणी निवेदनात केली आहे. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे अमित जैन, गणेश शिंदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर सिंग दडियाल, माजी शहरप्रमुख भरत मोरे, मनसेचे संतोष गंगवाल, भाजपाचे सुशांत खैरे, योगेश वाणी, नगरसेवक सत्येंन मुंदडा, मनसेचे अनिल गायकवाड पप्पू पाटणी आदी उपस्थित होते.





