शिवसेनेत युवतींचा मानसन्मान; आज युवती सेना पदांच्या मुलाखती
Respect for young women in Shiv Sena; Interviews for Yuvati Sena posts today
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 22 Oct 2021,20:00Pm.
कोपरगाव : युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवा सेना राष्ट्रीय सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना राष्ट्रीय सहसचिव अमोल किर्तीकर, युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव, तथा शिर्डी लोकसभा मतदार संघ विस्तारक सुनील (भैया) तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे आज शनिवारी (२३) रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे स्मारक कमान जवळील रिक्षा पतसंस्था कार्यालयाच्या “शिवालय” इमारत या ठिकाणी युवती सेना पदाच्या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघ विस्तारक सुनील (भैया) तिवारी यांनी दिली आहे.
या मुलाखती युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य युवा सेना विस्तारक सौ. गीता विनोद झगडे व महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव कुमारी शर्मिला येवले या घेणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.
महिलांच्या समस्या मार्गी लावून त्यांना न्याय देण्यात येईल, तसेच युवतींनी युवती सेनेत सहभागी होऊन संघटना मजबूत करावी, यासाठी युवतींच्या मुलाखती घेऊन त्यांची पदाधिकारी म्हणून नेमणूक करून शिवसेनेत युवतींचा मानसन्मान करण्यात येणार असलेल्या आहे. तेंव्हा मुलाखतीस युवतींनी हजर राहावे,असे आवाहन युवा सेना राज्य सहसचिव तथा शिर्डी लोकसभा मतदार संघ विस्तारक सुनील (भैया) तिवारी यांनी केले आहे.