समृद्धी महामार्गाच्या गाडी चालकाची हत्या ; दोघांना अटक, पाच दिवसाची पोलीस कोठडी
Samrudhi Highway driver killed; Two arrested, five days in police custody
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 29 Oct 2021,14:08Pm.
कोपरगाव : रस्त्याला खड्डे पडले असुन इकडुन गाडी घेऊन यायच नाही तु का आला ? व समृध्दी महामार्गाच्या गाडया घेऊन जायच्या नाही असे सांगुन पण तुझी बुम प्रेशरची गाडी का आणली असे म्हणत कोपरगाव तालुक्यात मारहाण करत गाडी चालकाची हत्या करण्यात आली असून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरचे वृत्त असे की, जगबिरसिंग रामकिसन सिंग वय ५६ वर्षे,रा.बी -२/२०८ बी-२ ब्लॉक, रोहिणी एक्सटेंशन,सेक्शन २० नवी दिल्ली हे बुमप्रेशर गाडी क्रमांक पीबी १३ बीडी ५५६९ ही गुरुवारी (२८) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील भोजडे लौकी जाणारे रोडवर भोजडे गावच्या शिवारात वादे यांचे पोल्ट्रीजवळ येथून जात असताना त्या परिसरातील सचिन सुदामराव खटकाळे (३४) वर्षे रा. खटकाळेवस्ती लौकी , नितीन सोमनाथ पवार (२३) वर्षे रा. मयुरनगर भोजडे यांनी ड्रायव्हर जगबिरसिंग रामकिसन सिंग यास अडवून या रस्त्याला खड्डे पडले असुन इकडुन गाडी घेऊन यायच नाही. तु का आला व समृध्दी महामार्गाच्या गाडया घेऊन जायच्या नाही असे सांगुन पण तुझी बुम प्रेशरची गाडी का आणली असे म्हणत त्यास शिवीगाळ करुन त्याचे पोटात लाथ मारुन जमिनीवर पाडून त्याचे छाती व पोटात लाथाबुक्कयाने जबर मारहाण करुन त्याला जिवे ठार मारले आहे अशी फिर्याद कुंदन सुरेशकुमार महंतो वय (२५), धंदा-क्लिनर, रा.पडौली, थाना-पुचरुखी, जि.शिवांग, राज्य-बिहार हल्ली रा. तीनचारी ,कोकमठाण,ता. यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी मध्यरात्री दोन जणांना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई भरत नागरे हे करीत आहेत.





