पशुवैद्यकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू;  नाटेगाव मधल्या घटनेने हळहळ

पशुवैद्यकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू;  नाटेगाव मधल्या घटनेने हळहळ

Veterinarian drowns in farm; The incident in Nategaon caused a stir

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 29 Oct 2021,15:08Pm.

कोपरगाव:  तालुक्यातील  नाटेगाव येथील मावस भावाच्या   शेततळ्याच्या भिंतीवर च्या  उभे राहून गावातून ट्रॅक्टर आला का हे पाहत असताना  पाय घसरून शेततळ्यात पडून(२४) वर्षीय पशुवैद्यकाचा मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.  शंकर सोमनाथ गायकवाड (२४)असे मृत पशुवैद्यकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव  येथे शंकर सोमनाथ गायकवाड हे शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास आपल्या मावस भावाच्या शेतात मका  कुट्टी करण्यासाठी गावातून ट्रॅक्टर आला का नाही हे शेततळ्याच्या भितींवर उभे राहून पहात असताना स्वतःच्या तंद्रीत असताना त्यांचा पाय अचानक घसरला. त्यामुळे ते शेततळ्यात पडले. परंतु त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांमध्ये  आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नाटेगाव येथील सरपंच   विकास अशोक मोरे (३३) शेती,यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिसांमध्ये खबर दिली, असून याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक आंधळे हे करीत आहे. नाटेगाव सरपंच विकास मोरे यांनी मोलाची मदत केली  या घटनेमुळे नाटेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page