कोपरगाव तालुक्यातील २१ गावातील शेतकरी विहीर घेण्यासाठी पात्र – आ.आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील २१ गावातील शेतकरी विहीर घेण्यासाठी पात्र – आ.आशुतोष काळे

Farmers from 21 villages in Kopargaon taluka are eligible to take wells – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 15 Nov.2021,19.30Pm.

 कोपरगाव : तालुक्यातील अंजनापूर, बहादराबाद, बहादरपूर, चांदेकसारे, डाऊच खु., देर्डे चांदव, देर्डे कोऱ्हाळे, धोंडेवाडी, धोत्रे, घारी, जवळके, जेऊर कुंभारी, खोपडी, मढी बु., मढी खु., मनेगाव, पोहेगाव बु., पोहेगाव खु., रांजणगाव देशमुख, शहापूर, सोनेवाडी, सोयेगाव, तळेगाव मळे, वेस या २१ गावातील शेतकरी सरकारच्या विविध योजनेतून विहिरी घेण्यास पात्र असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

तालुका अवर्षणग्रस्त असून कमी पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जिरायती भागाच्या गावातील सर्व गावांचे पुर्न: भूजल सर्वेक्षण करावे अशी मागणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार पुर्न: भूजल सर्वेक्षण करून तालुक्यातील वरील २१ गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेतून विहीर घेण्यासाठी पात्र ठरविले आहे.

यापूर्वी तालुक्यातील ३ गावांची निवड करण्यात आली होती. तालुक्यातील निवड झालेल्या २४ गावातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी योजनेतून विहिरीसाठी अनुदान घेणे सहज शक्य होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page