कोपरगावला सहा दिवसाआड पाणी; भोंगा फिरला, आणि पाणी सुटले !

कोपरगावला सहा दिवसाआड पाणी; भोंगा फिरला, आणि पाणी सुटले !

Kopargaon gets water for six days; The horn turned, and the water escaped!

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue16 Nov.2021,19.30Pm.

कोपरगाव : दिवाळी संपली, आणि कोपरगाव च्या पाचवीला पुजल्याप्रमाणे याप्रमाणे सहा दिवसांआड पाणी देण्याचा नगरपालिकेचा भोंगा फिरला, आणि दिवाळीचा आनंद घेणाऱ्या पाहुण्यांची परतीसाठी धांदल उडाली,  मंगळवारी (१६) मात्र पाटबंधारे खात्याने नांदूर मधमेश्वर ओव्हरफ्लोचे पाणी साठवण तलाव भरण्यासाठी सोडण्यात आले आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. रात्रीपर्यंत किंवा सकाळपर्यंत पाणी मिळण्याची शक्यता आहे थोडक्यात भोंगा फिरला, आणि पाणी सुटले !

जायकवाडी धरण तुडुंब भरलेले आहे. गोदावरी खोऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. असे असताना केवळ पाटबंधारे खात्याच्या साठ दिवस पाणी पुरवा या जाचक अटीमुळे ऐन थंडीत पाणी कपात करण्याची नामुष्की नगरपालिकेवर आली या कपातीमुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली, कर्मधर्मसंयोगाने नांदूर मधमेश्वर मधमेश्वरचे ओव्हरफ्लोचे पाणी ऊजव्या कॅनॉलमध्ये वळविण्यात आल्यामुळे आज मंगळवारी रात्रीपर्यंत पाणी कोपरगाव पर्यंत येईल त्यामुळे या कालव्यावरील दहा-पंधरा ग्रामपंचायती तसेच कोपरगाव नगरपालिका यांना पिण्यासाठी पाणी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे याला पाटबंधारे खात्याकडून दुजोरा मिळाला आहे. कोपरगाव नगरपालिकेच्या चार ही साठवण तलावातील ६०-७० टक्के पाणी संपले असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात पाणी पुरवठा सहा दिवसाआड करण्यात आला आहे. ऐन थंडीत कोपरगावकर यांचे पाण्यासाठी हाल होणार असून उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील याबाबत विचार न केलेला बरा अशी उलट-सुलट प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. चला देवाला दया आली आणि नांदूर मधमेश्वरचे ओव्हरफ्लोचे पाणी का होईना साठवण तलावात पडणार आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात नळाबरोबर तोंडचे  पाणी पळालेल्या कोपरगावकरांना काही दिवस तरी पिण्याच्या पाण्याची ऊब  मिळणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page