१९७१ चा विजय भारत मातेच्या शुरवीरांची विजय गाथा:आ.आशुतोष काळे
Victory of 1971 Mother India Knights of the Knights: MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 25 Dec.2021 16.40Pm.
कोपरगाव: सैनिकांचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सैनिकांनी आजवर अनेक विजय प्राप्त करून शत्रूला नामोहरम केले आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या प्रत्येक युद्धाच्यावेळी भारतीय सैन्याने दैदिप्यमान कामगिरी करून पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले आहे. अशाच संस्मरणीय व ऐतिहासिक युद्धापैकी १९७१ ला झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतमातेच्या सुपुत्रांनी पाकिस्तानला धूळ चारून विजय साकारला. हा विजय भारत मातेच्या शुरवीरांची विजय गाथा असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या विजय दिनानिमित्त कोपरगाव येथे सेवानिवृत्त सैनिकांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
आ.काळे म्हणाले की, आजवर अनेकवेळा भारतीय सैन्याने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे. सैनिकांचा देशासाठी केलेला त्याग कधीही न विसरणारा आहे. सेवानिवृत्त सैनिकांना निवृत्तीनंतर येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार असून सैनिक भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुतीराव कोपरे, मार्गदर्शक शांतीलाल होन, शिंदे, गुरसळ, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, नगरसेवक मंदार पहाडे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, रमेश गवळी, प्रकाश दुशिंग, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, आकाश डागा, रामदास केकाण, योगेश खालकर, इम्तियाज अत्तार, महेश उदावंत, विकास बेंद्रे, ऋषिकेश खैरनार, नारायण लांडगे, शंकर घोडेराव, गौतम खंडिझोड, दिनेश पवार, विकि जोशी, किशोर डोखे, बापू वढणे, मनोज नरोडे, निखील डांगे, शुभम लासुरे, विजय दाभाडे, डॉ. अशोक गावित्रे, नितीन शिंदे, श्रेणीक बोरा, रितेश राऊत, राहुल आव्हाड, अभिषेक कोकाटे, किरण बागुल, रहेमान कुरेशी, प्रताप गोसावी, राहुल राठोड, अर्जुन डूबे, भाऊसाहेब भाबड, संतोष शेलार, विजय शिंदे, मुकुंद भुतडा, हारूण शेख, ऋतुराज काळे आदींसह सेवानिवृत्त सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.