नगरपरिषद इमारतीला जास्तीत जास्त निधी देणार – आ.आशुतोष काळे
Municipal Council will provide maximum funds for the building – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 25 Dec.2021 17.00Pm.
कोपरगाव: महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजवर १२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. यासाठी माझे प्रयत्न कमी पडणार नाहीत. शहरवासियांना कामानिमित्त नेहमीच कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात यावे लागते. या इमारतीत सर्व सोयीसुविधा नागरिकांना मिळण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या तळमजल्याचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आ.स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ.काळे म्हणाले की, शहरातील जनतेने टाकलेल्या विश्वासातून शहराचा वर्षानुवर्षापासूनचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीने पाठपुरावा सुरु आहे. शहरातील बाजारपेठेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शहरातील रस्त्यांना देखील निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी उपलब्ध होऊन या रस्त्यांची कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहे. नगरपरिषदेच्या नूतन इमारतीत नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधांना निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ.प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, सौ.वर्षा शिंगाडे, नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, सौ रेखा जगताप, निखील डांगे, रावसाहेब साठे, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, डॉ. अमोल अजमेरे, संदीप देवळालीकर, फकीर कुरेशी,रमेश गवळी, राहुल देवळालीकर, ऋषिकेश खैरनार, गणेश लकारे, विशाल निकम, विजयकुमार गायकवाड, प्रमोद पाटील, किरण थोरात, योगेश वाणी, भाग्यश्री बोरुडे, वाल्मिक लहिरे, प्रकाश दुशिंग, दिनेश पवार, प्रतिक रुईकर, कुलदीप लवांडे, सुभाष दवंगे, मनोहर कृष्णाणी, संतोष दळवी, रविंद्र गायकवाड, अक्षय बोरा, राजेंद्र उशीरे, मनोज शिंदे, राजेंद्र वैरागळ, नितीन शिंदे, साजिद शेख, रहेमान कुरेशी, आयुब कच्छी, हारूण शेख, एकनाथ गंगूले, सचिन पगारे, तेजस साबळे, फिरोज पठाण, प्रवीण शेलार, अभिषेक कोकाटे, मुकुंद भुतडा, अभियंता सुनिल ताजने, धिरज गुरसळ, सहाय्यक नगर रचनाकार दिपक बडगुजर, रितेश मिरीकर, प्रेमकुमार गायकवाड, शांताराम शिनगारे आदी उपस्थित होते.





