कोपरगांव शहरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

कोपरगांव शहरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

Atal Bihari Vajpayee’s birthday celebrations in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 25 Dec.2021 17.30Pm.

 कोपरगांव – आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेसाठी व भारतीय जनता पार्टी साठी त्यागनारे भारतीय जनता पार्टी चे प्रमुख आधारस्तंभ स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आज कोपरगांव शहरातील सावरकर चौक येथे साजरी करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यानी प्रतिमा पुजन केले. यावेळी भाजपा चे जेष्ठ मार्गदर्शक टेकचंदज खुबानी, प्रभाकर वाणी, सतीषशेठ कृष्णानी, विजय बडजाते, विनायक गायकवाड़, योगेश वाणी, सुभाष दवांगे, संजय कांबले,प्रमोद पाटील ,प्रकाश सवाई,वसंत जाधव, किरण थोरात, कैलास निकम, मुकुंदराव कलकुंदरी,गणेश शिंदे, सुरेश कांगूणे,संदीप गौल आदि अनेक अटलप्रेमी स्वयंसेवक व नागरिक या प्रतिमपूजन कार्यक्रमाला हजर होते.

यावेळी टेकचंद खुबानी यांनी अटलजी बद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या तत्वाप्रमाणे भाजपा कार्यकर्ता वागला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक योगेश वाणी तर आभार प्रदर्शन विनायक गायकवाड़ यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page