कोपरगाव न्यायाधीश निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख निधीस प्रशासकीय मंजुरी – ना. आशुतोष काळे
Administrative sanction for 1 crore 66 lakh funds for Kopargaon judge’s residence – NA. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 23Jan.2022 17.50Pm.
कोपरगाव : येथील न्यायालय इमारतीसाठी ३८ कोटी निधी मिळविल्यानंतर न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी विधी व न्याय विभागाने दिवाणी न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख १७ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील न्यायालयीन इमारतींची दुरावस्था झाल्यामुळे वकील संघाच्या मागणीची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्यायालयीन इमारतीसाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करून मागील महिन्यात दिवाणी न्यायालय इमारतीसाठी विधी व न्याय विभागाकडून ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधी मिळविला होता. त्याच वेळी न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी देखील निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे यांनी प्रस्ताव दाखल केलेला होता व त्याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
त्या पाठपुराव्याची विधी व न्याय विभागाने तातडीने दखल घेवून न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख १७ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मागील महिन्यात न्यायालय इमारतीसाठी मिळालेला ३८ कोटी निधी व या महिन्यात न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख निधी मिळाल्यामुळे ना.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजितदादा पवार,पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, विधी, न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे आभार मानले आहे.





