कोपरगावात क्रिकेट खेळाडूंसाठी क्रिकेटचे मैदान व्हावे- निलेश धुमाळ

कोपरगावात क्रिकेट खेळाडूंसाठी क्रिकेटचे मैदान व्हावे- निलेश धुमाळ

Kopargaon should be a cricket ground for cricketers – Nilesh Dhumal

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 23Jan.2022 18.00Pm.

कोपरगाव: क्रिकेट हा हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता विषय होता. कोपरगावात आठवडे बाजार तळातील मैदानावर मुंबादेवी तरूण मंडळा मार्फत २५ वर्षांपासून क्रिकेटचे सामने होत आहे येथील अडचणी लक्षात घेता कोपरगावात क्रिकेट खेळाडूंसाठी क्रिकेटचे मैदान व्हावे अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भंडारा गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांनी रविवारी (२३) रोजी सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी दिले.

मुंबादेवी तरुण मंडळ व कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना माजी नगरसेवक कै.अँड. दिपक अण्णा माळी स्मरणार्थ सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेसाठीप्रथम पारितोषिक २१ हजार व चषक, व्दितीय पारितोषिक ११ हजार, तृतीय पारितोषिक ७ हजार पाचशे, चतुर्थी ५ हजार तसेच मॅन ऑफ व सिरिज,मॅन ऑफ व चषक या सह अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.या स्पर्धेत सुमारे ३२ संघांनी सहभाग घेतला असल्याची माहिती मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांनी दिली. यावेळी निलेश धुमाळ, बाळासाहेब रुईकर, शिवनारायण परदेशी, सुशांत घोडके, किरण बिडवे, उद्धवराव विसपुते, सुनील बंब, अनिल जाधव, मनोज कपोते हे प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेकरिता डॉ.नाईकवाडे हाॅस्पिटल, मित्र फाऊंडेशनचे वैभव आढाव,अंबिका तरुण मंडळाचे शुभम गायकवाड,माजी नगरसेवक कालु आव्हाड,भरत मोरे,गगन हाडा, रविंद्र कथले,गुरुकृपा मेडिकल यांचे सह अनेकांचे सहकार्य लाभले आहे. राहुल देवळालीकर, रोहित खंडागळे, ओम कपोते, निलेश गंगवाल, मनोज विसपुते, समर्थ दिक्षित, विवेक फंड, राजेंद्र गवळी, विजय उदावंत, अरविंद मंडलिक यांचे सह मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य, कोपरगाव तालुका क्रीकेट असोसिएशनचे सदस्य आणि क्रिकेट प्रेमींचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page