बाळासाहेब ठाकरे कॉलेजात, ठाकरे आणि बोस जयंती साजरी
Balasaheb Thackeray College, Thackeray and Bose Jayanti celebrations
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 23Jan.2022 18.20Pm.
कोपरगाव : बाळासाहेब ठाकरे हे स्पष्ट वक्ते व कणखरबाणा असलेले व्यक्तिमत्त्व होते त्यांनी मराठी भाषिकांचे एकत्रीकरण आणि संयुक्त मराठी चळवळीसाठी केलेले प्रयत्न आणि मुंबईला महाराष्ट्राच्या राजधानीचा दर्जा मिळून देण्यासाठी दिलेल्या लढ्या दिला. त्यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण केले असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांतीलाल जावळे यांनी केले.
प्रा.डॉ.जावळे म्हणाले, २३ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात पराक्रम दिवस म्हणून क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस जयंती दिन म्हणून सजरा केला जातो.सुभाषचंद्र बोस हे वीरता आणि शौर्य यांचे प्रतिक होते. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यात पुढाकार घेतला.भारताला पर्तान्त्रातून मुक्त करण्यासाठी “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा” या घोष वाक्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती जागृत केली. ‘जय हिंद आणि चलो दिल्ली’ य घोषणा आजही दुमदुमतात. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील तळपता सूर्य म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन लिपिक ठाणगे साईप्रसाद व विद्यार्थीनी खंडीझोड प्रांजली , खंडीझोड अंजली,औताडे अनिता व औताडे रोहिणी, आणि विद्यार्थी जोंधळे महेश,जाधव रोहित व साळवे गौरव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सोनाली वाके यांनी केले,तर आभार विद्यार्थी दीपक मुंगसे यानी मानले.





