समता नागरी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
Honesty of the employees of Samata Nagari Patsanstha
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 23Jan.2022 18.30Pm.
कोपरगाव: समता नागरी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत विज बिल भरण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकाची तीस हजाराची पर्स त्यांना परत करून समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याने आपला प्रामाणिकपणा दाखविला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की समता पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत २१ जानेवारी २०२२ रोजी सौ सुनिता दुगल एम.एस.सी.बी.चे वीज बील भरण्यासाठी शाखेत आल्या असता त्याच्या जवळ असणारी ३० हजाराची रक्कम विसरून शाखेतच राहिली. श्रीरामपूर शाखेच्या शिपाई कर्मचारी सौ रंजना लोंढे यांना ती रक्कम सापडली, त्यांनी ती रक्कम शाखाधिकारी श्री फारुख शेख यांच्या कडे दिली. त्यांनी चौकशी करून ती रक्कम सौ सुनिता दुगल यांना बोलावून देण्यात आली. प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी उपविभागीय अधिकारी श्री सोपान पठारे,उपशाखाधिकारी भरत कर्णावट ,कर्मचारी ग्राहक, सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व संचालक मंडळ, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी, अधिकारी आदींनी सौ रंजना लोंढे व सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक करत शाबासकी दिली.