मुख्याध्यापकांनी व्यवस्थापनाबरोबर गुणवत्ता वाढीवर भर द्यावा – ना. आशुतोष काळे
Headmasters should focus on quality enhancement along with management – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue15 Fab2022 19:50Pm.
कोपरगाव : मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून व्यवस्थापनाचे धडे घेवून विद्यालयाचे आदर्श व्यवस्थापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर देखील भर द्यावा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी एस.एस.जी.एम. महाविद्यालयात माध्यमिक मुख्याध्यापक मार्गदर्शन कार्यशाळेत केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.आर.सानप होते.
ना.काळे म्हणाले की, शिष्यवृत्ती परीक्षेचा उत्तर विभागाचा निकाल अतिशय चांगला लागला हि समाधानाची बाब असून यामध्ये सातत्य टिकून ठेवण्यासाठी गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न झाल्यास या कार्यशाळेचा उद्देश सफल होईल. रयत शिक्षण संस्थेत काम करण्याची संधी हि भाग्याची गोष्ट असून याची जाणीव ठेवून उत्कृष्ठ व्यवस्थापना सोबत गुणवत्ता वाढीवर देखील भर द्यावा याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला .
प्रास्तविक रयतचे पुणे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंके यांनी केले. यावेळी सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजीराव तापकीर, प्राचार्य डॉ. आर.आर.सानप, कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक एम.के. जाधव, एस. एल. ठुबे, जी.टी. गमे, एस.व्ही. काळे, एस.आर.उगले, डी. एन. नाईक, एस.एस. बोडखे, तसेच विविध माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सुत्रसंचलन श्रीमती छाया शिंदे यांनी तर आभार उपप्राचार्य रामभाऊ गमे यांनी मानले.





