शिर्डी विमानतळ : मंत्री ना. मुश्रीफ यांचे ना. काळेंकडुन स्वागत

शिर्डी विमानतळ : मंत्री ना. मुश्रीफ यांचे ना. काळेंकडुन स्वागत

Shirdi Airport: Minister no. Mushrif’s name. Welcome from Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tue 1March 2022 17:00Pm.

कोपरगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे शिर्डी श्री साईबाबा विमानतळावर श्री साई संस्थान अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी स्वागत केले.जिल्हास्तरीय कोरोना उपाय योजना व लसीकरण आढावा बैठकीसाठी ते नगरला चालले होते.

मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यास मोठी मदत झाली त्याबद्दल नागरिकांच्या वतीने ना. आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले.यापुढील काळात देखील मतदार संघाच्या रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी देवून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अथक प्रयत्नातून कोट्यवधीचा निधी आणून गावागावातील रस्त्यांची कामे मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी सचिन मुजगुले, संजय रोहमारे, प्रभाकर गुंजाळ, शशिकांत लोळगे, बाबासाहेब गुंजाळ, रावसाहेब कोल्हे, किरण भालेराव, गोकुळ कांडेकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page