महाशिवरात्र : ना.आशुतोष काळेकडून कुटुंबासह अमृतेश्वराचे दर्शन

महाशिवरात्र : ना.आशुतोष काळेकडून कुटुंबासह अमृतेश्वराचे दर्शन

Mahashivaratra: Darshan of Amruteshwar with family from Na. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tue 1Mar 2022 17:20Pm.

कोपरगाव : महाशिवरात्री निमित्त श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पत्नी सौ. चैताली व आयांश काळे यांच्यासह माहेगाव देशमुख येथील अमृतेश्वराची मनोभावे विधिवत पूजा व दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे श्री संत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या प्रेरणेतून माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुढाकारातून अमृतेश्वराचे मंदिर बांधण्यात आले आहेत. अलाहाबाद येथील स्वामी शंकराचार्य व प.पु.रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते या मंदिरात २००५ साली शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे.

त्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी कुटुंबासह अमृतेश्वराचे कुंभारी येथील राघवेश्वराचे व कोपरगाव बेट येथील दैत्यगुरू शुक्राचार्याचे दर्शन घेतले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page