बाळासाहेब ठाकरे कॉलेजात मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
Marathi Language Pride Day and National Science Day celebrated at Balasaheb Thackeray College
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 28 Fab2022 17:40Pm.
कोपरगाव: पोहेगाव येथील हिंदुहृद्यसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नितीन औताडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शांतीलाल जावळे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.
यावेळी नितीन औताडे म्हणाले, भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी संशोधन केले होते त्यामुळे सबंध देशात आज विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी ‘रामन परिणामा’ चा शोध लावला होता या त्यांच्या कार्याचा गौरव करीत १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात येते . हा पुरस्कार मिळविणारे ते केवळ भारतीय नव्हतेच तर आशिया खंडातील पहिले व्यक्ती होते अशी माहिती त्यांनी दिली.तसेच कशाप्रकारे मराठी भाषा जपावी तिचे दैनंदिन जीवनातील स्थान किती मोलाचे आहे यावर विदयार्थाना मार्गदर्शन केले.
विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन व काव्यवाचन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विदयार्थाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नवनवीन स्पर्धेचे व उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात येईल असे प्राचार्य डॉ.जावळे एस.आर.यांनी सांगीतले.
सुत्र-संचालन प्रा. गांधिले. बी. एस यांनी प्रास्ताविक प्रा. वाके.एस.बी यांनी केले तसेच प्रा. भांड व विद्यार्थिनी कु.वृषाली गोसावी, प्रा.सौ.चौधरी यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. आभार प्रा.सौ.खंडिझोड यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी,प्रध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.