महाशिवरात्र: गुरु शुक्राचार्य महाराजांच्या पालखीची बिपिन कोल्हेंच्या हस्ते महाआरती
Mahashivaratra: Maha Aarti of Guru Shukracharya Maharaj’s Palkhi at the hands of Bipin Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tue 1Mar 2022 17:30Pm.
कोपरगाव : बँडच्या तालावर, सनई चौघड्याच्या निनादात, हर हर महादेवचा जयघोष देत महाशिवरात्री उत्सवा निमित्त परमसद्गुरु गुरु शुक्राचार्य महाराजांची पालखी दक्षिणगंगा गोदावरी नदी भेटीसाठी आणण्यात आली होती, पालखीचे पारंपारिक धार्मिक पद्धतीने पूजन करून संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी महाआरती केली.
कोरोना काळामुळे तब्बल दोन वर्षा नंतर यंदा महाशिवरात्र पर्वकाळा निमित्त तालुक्यातील संवत्सर श्री शेत्र शृंगेश्वर मंदिरात गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या उपस्थितीत सायंकाळी गावातून शृगेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. हेमाडपंथी मंदिर कोकमठाण, बेट भागातील परमसद्गुरु गुरु शुक्राचार्य महाराज, प्रति त्रंबकेश्वर म्हणून ओळख असलेल्या कचेश्वर मंदिरात, विभांडक ऋषींना कोकमठाण आश्रमात, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिरात कुंभारी येथील राघवेश्वर मंदिरात, शिवानंद गिरी महाराज मंजूर येथील आश्रमात, माहेगाव देशमुख येथील अमृतेश्वर मंदिरात, शहरातील गावठाण भागातील रामेश्वरशिवमंदिरात, महादेव शिवशंकराच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती.
यात्रेनिमित्त भाविक भक्तांना महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी, भगर, केळी, खजूर राजगिरा लाडू शेंगदाणा चिक्की चहा-कॉफी, पिण्याचे थंडपाणी सरबत रसाचे विविध मंडळांच्या वतीने ठीक ठिकाणी वाटप करण्यात आले.
दक्षिणगंगा गोदावरी यंदा भरपूर पाणी आहे मात्र हे पाणी स्नानासाठी अस्वच्छ होते तरीही काही भाविकांनी हे पाणी पवित्र समजून स्नानाची पर्वणी साधली. शहरातील बाजार तळ भागात तब्बल दोन वर्षांनंतर लहान मुलांचे पाळणे विविध खेळणी स्टॉल लावण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या वतीने राघोजी भांगरे भाजी बाजारात भाजी विक्रेत्यांनी बसावे म्हणून फलक लावले आहेत. अनेक शिवमंदिरात शिवमहापूराण, शिवमहिम्नस्तोत्र, शिवलीलामृत पोथीचे वाचन, विविध ठिकाणी सत्संग प्रवचने करण्यात आली. तालुक्यातील विविध शिवमंदिरात शेकडो-हजारो भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली रांगेत दर्शन घेऊन भगवान शंकराला कोरोणाचे संकट जाऊ दे असे साकडे घातले