देयके सुरळीत करून द्या,उपसरपंचाची गटविकास अधिकार्‍यांकडे मागणी

देयके सुरळीत करून द्या,उपसरपंचाची गटविकास अधिकार्‍यांकडे मागणी

Make the payments smooth, demand of the sub-panch to the group development officer

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fir 4 Mar 2022 17:40Pm.

कोपरगाव : तालुक्यातील वेळापुर ग्रामपंचायतीने चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत विकास कामे केली असुन त्याच्या बिलाची रक्कम गेल्या एक महिनाभरापासुन ऑनलाईन प्रणालीत रखडली असुन त्यामुळे अंतिम देयके अदा करतांना मोठया प्रमाणांत अडचणी तयार झाल्या आहेत तेव्हा ही देयके तात्काळ सुरळीत करून द्यावी अशी मागणी उपसरपंच सतिष दिगंबर बोरावके यांनी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

 

त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी देखील याबाबत ग्रामविकास मंत्रालय, पालकमंत्री व जिल्हा परिषद अहमदनगरच्या प्रशासनाकडे मागणी करून वेळापुर ग्रामपंचायतीचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा असे कळविले आहे. श्री बोरावके पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही एक महिन्यांपासुन पाठपुरावा करत आहे त्याचप्रमाणे कोपरगांव पंचायत समितीचे संबंधीत विभागाचे ऑनलाईन कामकाज पाहणा-या अधिका-याकडेही वारंवार तकार केली आहे. वेळापुर ग्रामपंचायतीने चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत कॉकीटीकरण व अन्य कामे केली आहे त्याबाबतची देयके संबंधीत ठेकेदारांना अदा करावयाची आहे गेल्या महिनाभरापासून हे ठेकेदार चकरा मारत आहेत.

वरिष्ठस्तरावर याबाबत तक्रार करूनही दाद मिळत नाही, त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराला ग्रामपंचायती वैतागल्या आहेत. याबाबत गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी तात्काळ लक्ष घालावे असेही सतिष बोरावके शेवटी म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page