ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी १ कोटी निधी – ना. आशुतोष काळे
1 crore fund for roads in rural areas – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Fir 4 Mar 2022 17:50Pm.
कोपरगाव : मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून पुन्हा एकदा १ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचे श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
प्रस्ताव दाखल केले होते. त्या प्रस्तावाची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दखल घेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत पुन्हा १ कोटी रुपये निधी दिला आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, कोकमठाण. संवत्सर (लक्ष्मणवाडी) सावळगाव, कासली अंदरसुल रस्ता पढेगाव अंदरसूल रोड , धामोरी मायगाव देवी शिव रस्ता, मळेगाव थडी या रस्त्यांच्या खडीकरणासाठी प्रत्येकी १० लाख याप्रमाणे १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याबद्दल मतदार संघातील जनतेच्या वतीने ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री ना. धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांचे ना. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.