आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड ‘गुरु चिंतामणी’ उपाधीने सन्मानित
Ayurvedacharya Dr. Ramdas Awhad honored with the title ‘Guru Chintamani’
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 2 Mar 2022 17:40Pm.
कोपरगाव : आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड यांना सकल दिगंबर जैन समाज कोपरगाव, यांनी श्रमणसंग की पूर्ण निष्ठा, श्रद्धा से वैय्यावृत्ती करसेवा भक्ती प्रस्तुत केल्याबद्दल ‘गुरु चिंतामणी’ या उपाधीने सन्मानित केले आहे. हा हृदय सोहोळा आचार्य वर्धमान सागरजी यांचा समस्त संघ हा समस्त जैन समाजाचे सर्व बांधव यांचे उपस्थितीत पीपल्स बँक कार्यालयात प्रसिद्ध व्यापारी चंद्रकांत ठोळे व श्री गंगवाल यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
हिंदू,जैन दिगंबर जैन श्वेतांबर, मंदिरमार्गी स्थानकवासी जैन साध्वीजी,वारकरी,भारतीय सैनिक अशा अनेकांची निस्वार्थ वैद्यकीय सेवा डॉ. आव्हाड त्यां त्या समाजाचे नियमानुसार गेल्या पस्तीस वर्षापासून करत आले आहेत.
कोपरगाव येथे आचार्य १०८ श्री वर्धमान सागरजी यांचा संघ महिन्याभरासाठी आला होता. त्यादरम्यान अन्य गुरूंच्या प्रकृतीची काळजी नेहमीप्रमाणे डॉ. आव्हाड यांना घेण्यास सांगण्यात आले. सर्व गुरु फक्त आणि फक्त आयुर्वेदिकच औषधी घेत असल्याने त्यांना तो औषधोपचार डॉ. आव्हाड आनंदाने व तन्मयतेने देऊन आशीर्वाद मिळवत असतात.
त्यादरम्यान आचार्य वर्धमान सागरजी यांना कडाक्याच्या थंडीमुळे व सद्यस्थितीतील कोरोना परिस्थितीमुळे न्यूमोनिया व कोरोनाचा संसर्ग झाला .तीव्र ज्वर ,सर्दी ,खोकला व अन्य तीव्र लक्षणे असतांना त्यांना फक्त आयुर्वेदिक औषधावर बरे करण्याचे मोठे चॅलेंज डॉ. आव्हाड यांचे समोर होते. त्यात विशेष म्हणजे हि संत मंडळी फक्त एक वेळा सकाळी आहार घेतानाच औषधी घेतात .कितीही त्रास झाला किंवा आत्ययिक अवस्था आली तरीही ते औषधी तर दूरच परंतु पाण्याचा एक थेंबही घेत नाहीत .अशा परिस्थितीत त्यांना फक्त एक वेळ औषधी देऊन त्यांना असलेला व्याधी ,१०३ डिग्री ताप बरे करणे हे खूप टेंशन चे व कठीण काम होते .पस्तीस वर्षाचा अनुभव व आयुर्वेदावरील नितांत श्रद्धा यामुळे जैन गुरूंच्या नियमानुसार औषधोपचार देऊन फक्त चार दिवसात आचार्यांना डॉ आव्हाड यांनी व्याधीमुक्त केले .त्यांचे सर्व वैद्यकीय तपासणी रिपोर्ट्स फक्त चार दिवसात निगेटिव्ह आले .या कठीण प्रसंगी जैन समाजावर व आचार्यांच्या संघावर आलेले संकट आयुर्वेदामुळे टळले .