नाटेगाव सोसायटीवर पुन्हा काळे गटाची सत्ता

नाटेगाव सोसायटीवर पुन्हा काळे गटाची सत्ता

Kale group rule over Nategaon society again

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 7 Mar 2022 17:20Pm.

कोपरगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या नाटेगाव सोसायटी निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाचे १० सदस्य निवडून आले मागील ३८ वर्षापासूनचे या सोसायटीवर काळे गटाचे वर्चस्व आहे.

एकूण १३ सदस्य असलेल्या नाटेगाव सोसायटीत १० सदस्य काळे गटाचे तर ३ सदस्य विरोधी गटाचे निवडून आले आहेत.

माजी आमदार अशोक काळे व ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या संचालक मंडळाने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीचा हा विजय आहे. आवाज कमी करा असून विरोधकांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे काळे गटाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

काळे गटाचे विजयी उमेदवार मोरे गणेश वसंतराव, मोरे बाळू पोपट, मोरे सतीश कारभारी, मोरे अंबादास धोंडीबा, पिंगळे भारती रावसाहेब, मोरे घमा सुकदेव, सौ. मोरे लीलाबाई तान्हाजी, सौ. मोरे रंजना रघुनाथ, मोरे संतोष इंद्रभान, भालके भरत छबुराव. सर्व विजयी उमेदवारांचे व सर्व कार्यकर्त्यांचे माजी आमदार अशोक काळे व ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page