नगर-मनमाड हायवेवर अपघात; एक महिला व तीन बैल ठार

नगर-मनमाड हायवेवर अपघात; एक महिला व तीन बैल ठार

तर एक पुरुष एक महिला व दोन बैल,असे चार जखमी

Accident on Nagar-Manmad Highway; One woman and three oxen were killed One man, one woman and two oxen were injured

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 10 Mar 2022 16:,40Pm.

कोपरगाव: अज्ञात ट्रकने ऊसतोडणी कामगारांच्या तीन बैल गाड्यांना दिलेल्या धडकेत बैलगाडीवरील तरुण महिला व तीन बैल जागीच ठार झाले असून याच अपघातात आणखी एक पुरुष व एक महिला असे दोघेजण व दोन बैल जखमी झाल्याची घटना गुरुवारी (१०) रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात साई लॉनसमोर घडली.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा ऊस तोडणी कामगार कामगारांच्या सात गाड्यांचा ताफा कारखाना येथून येसगाव नाटेगाव शिवारातील ऊस तोडणी करण्यासाठी गुरुवारी पहाटे बैलगाड्या घेऊन जात होत्या दरम्यान सहा वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील येसगाव शिवारातील साई लॉन समोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने लागोपाठ तीन बैलगाडयांना जोराची धडक दिली. या अपघातात ऊस तोडणी महिला कामगार मोनाबाई दादाजी पवार (२७) यांचा जागीच मृत्यू झाला तर दादा अकडू पवार व कल्याबाई सुभाष अहिरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाईकवाडे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या दुर्घटनेमध्ये तीन बैलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन बैलही जखमी झाले. सदर घटनेची माहिती समजताच अमृत संजीवनीचे ट्रान्सपोर्ट अधिकारी केशवराव होन घटनास्थळी हजर झाले.

केशवराव होन यांनी सदर घटनेची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर शिवाजी दिवटे, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, जनरल मॅनेजर बापुराव औताडे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड, हवालदार श्री आंधळे हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कोल्हे कारखान्याची रुग्णवाहिकेसह कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

अपघातानंतर ट्रक वेगाने निघून गेला असला तरी हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

मालेगाव येथील केदा भिवसेन पाटील या मुकादमाची ऊस तोडणी कामगारांची टायर बैलगाडीची गॅंग आहे.

दुर्घटनेत मयत झालेल्या मोनाबाई दादाजी पवार यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखमीना कोपरगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.पशु वैद्यकीय अधिकारी डॉ कोळपे व श्रीमती काटे यांनी बैलांचे शेव विसर्जन केले तर जखमी बैलावर उपचार केले.

कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page