संजीवनी व कोर्सेरा मध्ये सामंजस्य करार – दुलेस क्रिष्णन
Reconciliation Agreement between Sanjeevani and Corsera – Dules Krishnan
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय एक क्रांतीकारी निर्णयSanjeevani Engineering College is a revolutionary decision
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 10 Mar 2022 16:,50Pm.
कोपरगांव: जसे तंत्रज्ञान बदलते तसे जगातील सर्वच औद्योगीक आस्थापनांनी अनेक क्रांतीकारी बदल आत्मसात केले आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार औद्योगीक जगताला वेगवेगळे कौशल्ये आत्मसात असलेले तंत्रज्ञ लागतात. कोर्सेराच्या अभ्यासक्रमातुन औद्योगीक गरजांना पुरक असे तंत्रज्ञ तयार होत आहे व अशा नवोदित तंत्रज्ञांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अधिकचे तंत्रज्ञान व कौशल्ये देण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोर्सेरा फाॅर कॅम्पस अंतर्गत कोर्सेराशी समजोता करार करून शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांतीकारी पाऊल टाकले आहे, असे उद्गार भारत, ऑस्ट्रेलिया व न्युझिलंड साठी कार्यरत असलेले कोर्सेराचे मॅनेजिंग डायरेक्टर दुलेस क्रिष्णन यांनी काढले.
सदर प्रसंगी दुलेस क्रिष्णन हे विद्यार्थी व प्राद्यापकांना मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व युनायटेड स्टेटच्या ऑनलाईन कोर्सेस देणाऱ्या जागतिक पातळीवरील कोर्सेरा यांच्यात नुकताच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात परस्पर समजोता करारावर सह्या करण्यात आल्या.
यावेळी कोर्सेराचे एंटरप्राईज अकौंट डायरेक्टर मालव आचार्य व भारताच्या कस्टमर सक्सेस मॅनेजर शुभांगी सुद व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी डाॅ. ठाकुर यांनी सर्वांचे स्वागत करून संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली.
अमित कोल्हे यांनी सांगीतले की कोरोना महामारीने शैक्षणीक क्षेत्रात अनेक बदल घडविले आणि नविन शिक्षणाच्या पध्दतीही आत्मसात करण्यास भाग पाडले. या अनुषंगाने कोर्सेरा अभ्यासक्रमांची भुमिका जगभर प्रभावी ठरली. सध्याच्या औद्योगीक गरजांनुसार व कार्पोरेट जगताला अभिप्रेत असलेल्या कौशल्ये प्राप्त करण्यासाठी संजीवनी व कोर्सेरा यांच्यातील समजोता करार खुपच प्रभावी ठरून रोजगारभिमुखता वाढीस लागणार आहे. सध्या कोर्सेरा मार्फत ८००० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण ऑनलाईन पध्दतीने दिल्या जाते. हे अभ्यासक्रम जागतिक पातळीवरील नामांकित विद्यापीठांमधिल तज्ञ प्राद्यापकांनी तयार केलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना आकर्षक वार्षिक पॅकेज मिळण्यास मोठी मदत होणार आहे. आजही संजीवनी ही संस्था विद्यार्थ्यांना नामांकित कपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी अग्रगण्य समजल्या जाती. परंतु आता कोर्सेरा बरोबर असल्यामुळे यात अधिक परीणामकारकता दिसुन येईल. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे व कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीने कोर्सेराशी हातमिळविणी करून अत्यंत महत्वाचे पाऊल टाकले आहे. कारण कोर्सेराच्या निकषांनुसार भारतातील खुप थोड्या संस्था कोसेरा बरोबर करारासाठी पात्र आहेत, त्यात संजीवनीही पुढे आहे, हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपुर्ण बाब आहे.
शेवटी दुलेस क्रिष्णन यांनी विद्यार्थी व प्राद्यापकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. डीन अकॅडेमिक्स डाॅ. ए.बी. पवार यांनी आभार मानले.
Post Views:
280