महिलांनी कुटुंबाबरोबर आपले आरोग्य सांभाळले पाहिजे- विमल पुंडे

महिलांनी कुटुंबाबरोबर आपले आरोग्य सांभाळले पाहिजे- विमल पुंडे

Women should take care of their health with family – Vimal Punde

वारीगावात महिलांचा सन्मान Respect for women in Warigaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 9 Mar 2022 18:,40Pm.

कोपरगाव : सुख साधनाच्या मागे धावल्यामुळे आशा, आकांक्षा कमीच होत नाही. मात्र, अशाही परिस्थिती साधनांना महत्व द्यायचे कि, आरोग्याला हे देखील ठरविणे महत्वाचे आहे. त्यामुळे खासकरून महिलांनी कुटुंबाचा कारभार चालवताना आपल्या शरीराकडे लक्ष देत योग, प्राणायाम करून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे, असा मौलिक सल्ला कोपरगाव येथील योग प्रसार, प्रचार संस्थेच्या अध्यक्षा योगशिक्षिका विमल पुंडे यांनी वारी येथे राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्टच्या महिला सन्मान कार्यक्रमात दिला.अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीच्या माजी सदस्य कुसुम टेके होत्या.

मंगळवारी वारी ग्रामपंचायत येथे १५० महिलांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरवपूर्वक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीच्या माजी सदस्य कुसुम टेके होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर व राहुल दादा टेके पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीपप्रज्वलन करून तसेच राष्ट्रगीताने करण्यात आली.

यावेळी वैशाली झाल्टे, मनीषा गोर्डे, वंदना गोडगे, शारदा पालवे, रेणुका गायकवाड, प्राचार्या डॉ. सुनीता पारे, मुख्याध्यापिका पौर्णिमा गोर्डे, विशाखा निळे, नंदा निळे, सुवर्णा गजभिव, अश्विनी खैरनार, अनिता संत, वनिता चव्हाण, सरपंच सतीश कानडे, योग शिक्षक दत्तात्रय पुंडे, दिलीप वारकर, विकास बागुल, सचिन सगळगिळे, नरेंद्र ललवाणी, चंद्रकांत पाटील, चंद्रभान मलिक, विजय महाडिक यांच्यासह वैद्यकीय, शैक्षणिक, अंगणवाडी, आशासेविका, मदतनीस, धार्मिक, होमगार्ड, स्वच्छता विभाग याप्रमाणे शासकीय, खासगी क्षेत्रातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

यावेळी समुपदेशक वैशाली झाल्टे यांनी उपस्थित महिलांना महिलांच्या स्वरक्षणासंदर्भातील कायद्याविषयी विस्तृत माहिती दिली.

योग शिक्षक दत्तात्रय पुंडे यांनी योगासंदर्भात माहिती दिली.

यावेळी वंदना गोडगे, शारदा पालवे, रेणुका गायकवाड, डॉ. सुनीता पारे, विशाखा निळे, सुवर्णा गजभिव, प्रतिभा टेके, सायली टेके, साक्षी टेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता महाडिक व राधा टेके यांनी केले. तर सुवर्णा गजभिव यांनी आभार मानले. फोटो ओळी वारीत विविध क्षेत्रातील महिलांचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला. ——–

Leave a Reply

You cannot copy content of this page