संजीवनीच्या पाच प्राध्यापकांना पीएचडी प्रदान
Awarded PhD to five professors of Sanjeevani
डाॅ. निखील पाटणकर, डॉ.वृषाली ससाणे, डॉ.भारती शिंदे, डॉ. डी एन. पाटील, डॉ. शामराव घोडके Dr. Nikhil Patankar, Dr. Vrushali Sasane, Dr. Bharti Shinde, Dr. D. N. Patil, Dr. Shamrao Ghodke
संजीवनीची उच्च विद्याविभुषीत प्राद्यापकांमुळे वेगळी ओळख Different identity of Sanjeevani due to highly educated professors
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 10 Mar 2022 17:,00Pm.
कोपरगांवः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन, एमबीएच्या एक व संजीवनी डी. फार्मसीच्या एक प्राद्यापक यांना नुकत्याच प्रबंध सादर केलेल्या विद्यापीठांकडून पीएच. डी. (विद्या वाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांमधिल पीएच. डी. धारकांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शैक्षणिक जगतात संजीवनीची उच्च विद्याविभुषीत प्राद्यापकांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या सर्व पाचही नवोदित पीएच.डी. धारकांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. ए. एस. सय्यद, डॉ.विनोद मालकर, डाॅ. एम.एस. पुरकर व डाॅ. माधुरी जावळे उपस्थित होते.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी विभागातील प्रा. निखिल सुभाष पाटणकर यांनी पीएच.डी. इन काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग या शाखेतून ‘डीझाईन अँड इम्प्लिीमेनटेशन ऑफ की जनरेशन टेक्निक्स इन आयओटी सिस्टिम्स’ या विषयावर मार्गदर्शक डाॅ. राजेशकुमार भोगे यांच्या मार्गददर्शनाखाली संशोधन करून पीएच.डी. ही पदवी मिळविली. त्यांनी स्मार्ट आयओटी उपकरणांमध्ये धोका विरहीत जलद संभाषण व त्या उपकरणांद्वारे लागलीच कार्यवाही होण्याचे तंत्र विकसीत केले.
डाॅ. निखील पाटणकर हे पुणे विद्यापीठाच्या व्हाॅलीबाॅल संघाचे माजी कर्णधार सुभाष भाऊसाहेब पाटणकर यांचे चिरंजीव आहे.
सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या प्रा. वृषाली ससाणे यांनी हायड्रोकेमकिल इनव्हेस्टिगेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ग्रावुंड वाटर क्वाॅलिटी प्रिडिक्शन माॅडेल युझिंग एएनएन अँड एसव्हीएम या विषयावर डाॅ. अल्का पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर करून पीएच. डी. ही पदवी मिळवली. डाॅ. ससाणे यांनी पाण्याची गुणवत्ता अधिक अचुकपणे शोधण्यासाठी न्युरल नेटवर्कचा वापर केला.
सिव्हिल इंजिनिअरींगच्याच प्रा. भारती शिंदे यांनी डाॅ. ए.एस. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अनालिसिस ऑफ सिलिंड्रीकल अँड स्पेरीकल काम्पोझिट शेल युझिंग हायर ऑर्डर शिअर अँड नाॅर्मल डिफाॅफर्मेशन थिअरी या विषयावर प्रबंध सादर करून स्पेस व्हेईकलच्या (विमान, हेलीकाॅप्टर, इत्यादी) वक्र रचनेवर वजनाचा काय परीणाम होतो हे शोधण्यासाठी साॅफ्टवेअरच्या मदतीने अनालिटीकल माॅडेल विकसीत केले.
एमबीए विभागाच्या प्रा. शामराव घोडके यांनी अर्थशास्त्राशी निगडीत विषयावर प्रबंध सादर केला. त्यात त्यांनी आर्थिक नियोजन कसे करावे व हे सुचविले आहे. त्यांना डाॅ. इ. बी. खेडकर यांनी मार्गदर्शन केले.
फार्मसी विभागात तर प्रा. डी एन. पाटील यांनी मती मंद व्यक्तींसाठी देण्यात येणाऱ्या क्युएटीपाईन फ्युमेरेट या औषधाची सहा पटीने विघटन क्षमता वाढविली. त्यांना डाॅ. स्वप्नील शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.





