टाकळी येथे महिलांसाठी शेळी दूध व दुग्ध व्यवस्थापन प्रक्रिया प्रशिक्षण
Goat Milk and Milk Management Process Training for Women at Takli
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 10 Mar 2022 17:,20Pm.
कोपरगाव : तालुक्यातील टाकळी येथे महाराष्ट्र शासन – कृषी विभाग आत्मा अंतर्गत महिलांसाठी शेळी दूध व दुग्ध व्यवस्थापन प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच टाकळी येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून कुटुंबाचा आर्थिक भार हलका केला आहे. महिलांकडे असलेल्या जिद्द व चिकाटीतून आज अनेक महिलांनी उद्योग जगतात वेगळा ठसा उमटविला आहे. या महिलांचा आदर्श घेवून बचत गटाच्या महिलांनी गृह उद्योगातून बचत गटाच्या महिलांनी कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन यावेळी सौ. पुष्पाताई काळे यांनी उपस्थित महिलांना केले.
सौ. पुष्पाताई काळे पुढे म्हणाल्या की, बचत गटाच्या महिलांना उभारी देण्यासाठी घरबसल्या करता येणाऱ्या उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन देण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. महिलांनी या संधीचा फायदा घेवून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. पतपुरवठा करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ सातत्याने सर्वोतोपरी मदत करीत आहे.
यावेळी भाऊसाहेब देवकर, बाळासाहेब देवकर, सुरेश देवकर, शशिकांत देवकर, गोरख देवकर, सनी आव्हाड, बाळासाहेब पाईक, संभाजीराव देवकर, रंजना देवकर, भारती देवकर, कविता नांगरे, स्नेहल देवकर, अंजना कुलटे, स्वाती देवकर, मंगल देवकर, प्रतिभा देवकर आदींसह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.