त्यांच्यातील बेधडक वृत्तीमुळेच अनेक व्यवसायात महिला आघाडीवर – सौ. चैताली काळे

त्यांच्यातील बेधडक वृत्तीमुळेच अनेक व्यवसायात महिला आघाडीवर – सौ. चैताली काळे

Due to their fearless attitude, women are at the forefront in many businesses – Mrs. Chaitali Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Thu 10 Mar 2022 17:,30Pm.

 कोपरगाव : महिला या सक्षमच असतात त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जावू शकतात. त्यांच्या बेधडक वृत्तीमुळेच आज अनेक व्यवसायात महिला आघाडीवर असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी संचालिका सौ. चैताली काळे यांनी भोजडे कान्हेगाव येथे केले. महाराष्ट्र शासन-कृषी विभाग आत्मा अंतर्गत महिलांसाठी शेळी दूध व दुग्ध व्यवस्थापन प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सौ.चैताली काळे म्हणाल्या, प्रत्येक महिला सक्षम आहे परंतु सर्वच महिलांना आपल्यात असणाऱ्या सामर्थ्याची जाणीव नाही. त्यामुळे आजही अनेक महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात वावरतांना दिसत नाही. अशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून विविध घरगुती व्यवसायांचे प्रशिक्षण देवून स्वयंपूर्ण करण्याची मोहीम प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे, सौ. पुष्पाताई काळे, श्री साईबाबा संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यापुढील काळात बचत गटाच्या महिलांना मदत करून बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेवटी दिली .

यावेळी कृषी विभागाचे अविनाश सावंत, शैलेश आहेर, शकुंतला सांगळे, सुमन कडेकर, मंदाकिनी चौधरी, शांता चौधरी, कल्पना चौधरी, जयश्री काळे, बबनराव सांगळे, देवचंद कडेकर, दिपक भाकरे, रामकृष्ण सोळसे, लक्ष्मण चौधरी, रविंद्र सांगळे, संदीप काळे, बाबासाहेब कडेकर, बाळासाहेब पवार, संतोष सांगळे आदींसह कान्हेश्वर बचत गट, कचेश्वर बचत गट, गंगा बचत गट, नीळकंठेश्वर बचत गट, जय मल्हार बचत गट, जय बजरंग बचत गट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बचत गट, जय गजानन बचत गट, राजा विरभद्र बचत गट, साई महिमा बचत गट, साईच्छा बचत गट आदी बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page