Kopargaon Shiv Jayanti Festival Committee Chairman Nitish Borude
तिथीप्रमाणे २१ मार्चला शिवसेनेची शिवजयंतीShiv Jayanti of Shiv Sena on 21st March as per the date
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sun 13 Mar 2022 18:,13Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहर व युवा सेना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी शनिवारी (१२) रोजी सायंकाळी इंदिरा शॉपिंग सेंटर माजी शहरप्रमुख सनी वाघ यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी नितीष बोरूडे, व किल्ले शिवनेरी येथून पायी शिवज्योत आणण्यासाठी माता वैष्णो देवी ग्रुप, गांधीनगर यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यावेळी शिवसेना माजी उपनगराध्यक्ष गटनेते योगेश बागुल, माजी आरोग्य सभापती नगरसेवक कालू आप्पा उर्फ अनिल आव्हाड, माजी शहरप्रमुख सनी वाघ, माजी शहर संघटक शिवनारायण परदेशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी दीपक कराळे, अभिजीत आव्हाड, ऋषी धुमाळ, महेश गायकवाड, संघटकपदी सागर फडे, बंटी गोसावी, सहसंघटकपदी अमोल घंगारे, शिवस्मारक दुग्ध अभिषेक नियोजन सनी काळे, किरण गायकवाड, मिरवणूक नियोजन सागर परदेशी, संदीप बिडवे यांची निवड करण्यात आली.