सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनबद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनबद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

Reactions of dignitaries regarding the demise of Sahakar Maharshi Shankarrao Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 16 Mar 2022 19:,20Pm.

कोपरगाव:

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे.राज्यातल्या कृषी उत्पादनातल्या प्रयोगशीलतेला व्यापक चालना दिली ती शंकरराव अप्पांनी. शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळालं होतं.अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला. पाटपाण्याचा प्रश्न सोडवला. खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ चालवली. सहकारी संस्थांसोबत शिक्षणसंस्थांचे मोठे जाळे उभारले.साखर या विषयासाठी जगभ्रमंती करून शंकररावांनी प्रचंड व्यासंग केला. ग्रामीण विकासासाठी आंतरिक तळमळ आणि प्रबळ इच्छाशक्ती हे त्यांचे गुणविशेष सामाजिक क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंगिकारावे असे होते. त्यांचा आप्तपरिवार व सर्वदूर पसरलेल्या सहकार क्षेत्रातल्या अनुयायांप्रति माझ्या शोकसंवेदना! स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना श्रद्धासुमन!-शरद पवार


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सहकारातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार-शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. पाण्याचे प्रश्न ते अतिशय पोटतिडकीने मांडत. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने प्रवास आणि त्यातून अनेक विषयांवर विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. अनुभवाचा समृद्ध झरा असलेले हे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांति


‘सत्याग्रही शेतकरी’ हरपला !

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. सहकार आणि पाणी प्रश्नांवर नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती.भावपूर्ण श्रद्धांजली !
ॐ शांती- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

सहकार क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले

साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे ,
जिल्ह्यात अथवा राज्यात कोपरगावचा विषय येतो त्यावेळी एवढे मोठे दैदिप्यमान काम या दोन दिग्गज नेत्यांनी नि:स्वार्थपणे सहकार क्षेत्रात केलेल्या कर्मवीर शंकरराव काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे या दोन सहकार नेत्यांचे आवर्जून नाव घेतले जाते.
एका नावाच्या व एका राशीच्या या दोन शंकररावांनी आदर्श सहकार कसा असावा याची जिल्ह्यात व राज्यात कोपरगावची वेगळी ओळख करून दिली आहे. राजकारण व समाजकारण करीत असतांना जिल्ह्यातील सर्वच घटकांवर काळे साहेब व कोल्हे साहेब या दोन सहकार रत्नांचे प्रभुत्व होते. कोल्हे साहेबांच्या दु:खद निधनामुळे दृरदृष्टी असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या रूपाने सहकार क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले हे कोपरगाव तालुक्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली !
ॐ शांती-

Leave a Reply

You cannot copy content of this page