सहकारातील संजीवनी हरपली – छगन भुजबळ

सहकारातील संजीवनी हरपली – छगन भुजबळ

Co-operative revival lost – Chhagan Bhujbal

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sun 20 Mar 2022 14:50Pm.

कोपरगाव:  शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची वेशभूषा परिधान केली.त्यांनी मराठी मातीतील माणसासाठी लोककल्याणाची कामे केली. शेती क्षेत्रात त्यांनी संशोधनाला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना शेतीला दुधासोबत इतर पूरक व्यवसायाची जोड मिळवून दिली. राज्यातील राजकारणात त्यांना विशेष स्थान होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी सहकार व शेती क्षेत्राविषयी सतत मार्गदर्शन केले. शरद पवार यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनाने सहकार महर्षी आणि सहकारातील संजीवनी हरपली अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री छगन भुजबळ व बिपिन कोल्हे

याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे, डॉ.मिलिंद कोल्हे, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, अमृता पवार आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page