शेतीला खऱ्या अर्थान समृद्ध करण्यात कोल्हे यांचे योगदान  विसरता येणार नाही.- खासदार डॉ. सुजय विखे.

शेतीला खऱ्या अर्थान समृद्ध करण्यात कोल्हे यांचे योगदान  विसरता येणार नाही.- खासदार डॉ. सुजय विखे.

Kolhe’s contribution in enriching the true meaning of agriculture cannot be forgotten. – MP Dr. Sujay Vikhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sun 20 Mar 2022 14:00Pm.

कोपरगांव :  शंकरराव कोल्हे यांचे अहमदनगर जिल्हयाच्या विकासात अमुलाग्र योगदान असुन शेती, पाणी, सहकार, उस उत्पादकांचे प्रश्न सोडविण्याची हातोटी अत्यंत वाखाणण्याजोगी होती. कोपरगाव तालुक्यात बंधारे बांधून शेतीला खऱ्या अर्थान समृद्ध करण्यात कोल्हे यांचे योगदान कुणालाही विसरता येणार नाही.अशा शब्दांत खासदार डॉ. सुजय विखे यांनी श्रद्धांजली वाहिली.

खासदार डॉ सुजय विखे यांनी कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी श्रीमती सिंधूताई कोल्हे, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलिंददादा कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकदादा कोल्हे, ईशानदादा कोल्हे, वेदांग मिलिंद कोल्हे, डॉ. प्राची वसंतराव पवार, प्रणवदादा वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार आदी उपस्थित होते.          

ते पुढे म्हणाले की, राज्यात अहमदनगर जिल्हयाचे नेतृत्व प्रबळ आहे. ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे, स्व. बाबुरावदादा तनपुरे, स्व. भाऊसाहेब थोरात, स्व. शंकरराव काळे, स्व. शंकरराव कोल्हे आदींनी जिल्हयाची बांधणी करून समृद्ध करण्याचे काम केले. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम असुन शेती, पाण्याच्या प्रश्वाची त्यांनी सोडवणुक करून उभे केलेले वैभव निश्चितच युवा पिढीला प्रेरणादायी आहे, त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्याचे नामांकित विचारपीठ हरपले.असे शंकरराव कोल्हे आता पुन्हा होणे नाही. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राचे नुकसान झाले आहे. विखे परिवार व प्रवरा उद्योग समूह कोल्हे कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखात सहभागी आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page