श्रमदान विकासाचा जनता जनार्दन हरपला- रमेशगिरी महाराज 

श्रमदान विकासाचा जनता जनार्दन हरपला- रमेशगिरी महाराज

Janata Janardan Harpala of Shramdan Vikas- Rameshgiri Maharaj

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sun 20 Mar 2022 14:40Pm.

 कोपरगांव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि त्यांची पुढची पिढी सामाजिक कार्यात जिल्हयांत विशेष उल्लेखनीय असुन, शंकरराव कोल्हेंच्या निधनाने श्रमदान विकासाचा जनता जनार्दन आपल्यातून निघुन गेला अशा शब्दात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प.पू. रमेशगिरी महाराज यांनी श्रद्धांजली वाहिली.

कोपरगांव बेट आणि पंचक्रोशीच्या जनकल्याणांसाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी लोकसहभागाचा मंत्र जपत राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे अनुयायी होत त्यांच्या श्रमदानाला महत्व देत त्यानुरूप कार्य केले. त्यांचा कृषी क्षेत्रात गाढा अभ्यास होता, संजीवनी आणि त्यावर चालणारा चरितार्थ त्यांनी अविरत जपला, असा महान नेता पुन्हा होणे नाही. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची विचारधारा त्यांनी जपती याभागाचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून दिले.
मोहनराव चव्हाण, अंबादास अंत्रे व त्यांचे सर्व सहकारी यांनी शंकरराव कोल्हे यांच्या प्रत्येक कार्याला कामाची साथ देत त्यांच्या निर्णयाची अंमलबजावण करत खऱ्या अर्थाने जनार्दन स्वामींचा संदेश सर्वदूर पोहोचवियात शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुह, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने जे काम केले त्याला तोड नाही. संजीवनी बंधाऱ्यामार्फत केलेली जलसमृद्धी जनार्दन स्वामी भक्तांनी कायमस्वरूपी जपावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page