गीतेच्या पाच मुख्य तत्वांचे शंकरराव कोल्हेंनी तंतोतंत पालन केले-महंत राजधरबाबा
Shankarrao Kolhe strictly adhered to the five main principles of the Gita – Mahant Rajdharbaba
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sun 20 Mar 2022 14:20Pm.
कोपरगांव : कर्म करा, श्रद्धा सचोटी विश्वास ठेवा, सयंमाने जग जिंका, रागावर नियंत्रण ठेवा आणि कुणांचाही द्वेष करू नका ही भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेली गीतेची पाच मुख्य तत्व असून त्याचे तंतोतंत पालन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले, त्यांच्या जाण्याने कर्माचा ऐतिहासीक ठेवा हरपला अशा शब्दात चक्रधर स्वामी महानुभाव आश्रमाचे महंत राजधरबाबा यांनी शोक व्यक्त केला.
शंकरराव कोल्हे आणि संजीवनी उद्योग समुह व त्यांच्या परिवाराने महानुभाव पंथासह सर्व धार्मिक कार्यात गरुडझेप घेतलेली आहे, ती अशीच वाढत जावों असेही ते म्हणाले. माजी मंत्री कै. शंकररावजी कोल्हे यांच्या पित्यर्थ महानुभाव आश्रम संवत्सर येथे श्रीमद् भगवतगिता पारायण (शांती पाठ) मंगल स्नान, विडा अवसर, इ. विधी संपन्न झाले, प्रसंगी तपस्वीनी माता,साधू संत व सदभक्त, संजीवनी साखर कारखान्याचे माजी संचालक, त्रंबकराव परजणे पांडुरंग पा.शिंदे (शास्त्री), शिवाजीराव पा.बारहाते, अभियंते किशोर त्र्यंबकराव परजणे, गोविंद परजणे, अनिल परजणे, सोमनाथ परजणे, ज्ञानेश्वर शिंदे, पंचक्रोशीतील ग्रामस्थ महानुभाव उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.